देह तें देऊळ आत्मा देव मूळ । प्रेम कंजफूल तोषवाया ॥१॥

साधन विवेक वैराग्य निःशंक । अन्य जें अशेख पोटपूजा ॥२॥

अहंब्रह्मध्यान महावाक्यमनन । अन्योन्य कथन अभ्यास हा ॥३॥

’रंग’ देहभान होतां निरसन । सच्चित्सुखधन प्रकाशला ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel