- -
किती दुष्काळ पाडलं या उन्हानं
कर्जबाजारी झालों पैशानं
आता व्याकुळ झालों मनांन
किती दुःख दिलं आम्हांस या देवानं
पिवयास पाणी नाही
शेतांत घालयासं पाणी नाही
आता व्याकुळ झालो तहानानं
किती दुःख दिलं आम्हांस या देवानं
पोट भरुन खावयास अन्न नाही
बैलांस खावयास चारा नाही
आता व्याकुळ झालो या भुकेनं
किती दुःख दिलं आम्हांस या देवानं
सरकार काही कर्ज माफ करेनां
सावकार काही पैसा देईंना
आता व्याकुळ झालो पैशांन
किती दुःख दिलं आम्हांस या देवानं
आता आत्महत्येशिवाय पर्याय उरेनां
राहिला लटकत दोरीवर एकटा कुटुंबाविना
झालं पोरकं सार कुटुंब त्याच्याविना
आता व्याकुळ झाले कुटुंब त्याच्या दुःखानं
किती दुःख दिलं आम्हांस या देवानं
- सुनील शेट्टी
ता. शहापुर जि. ठाणे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.