संध्याकाळी सारे नटून थटून कॉलनीच्या बागेत गोळा झाले . पण संध्याचा पत्ता नव्हता . " वेणू , तू मावशी कडे जा आणि गोड बिड बोलून संध्याला घेऊन ये . " दिपा म्हणाली .
नेहमी मित्रांच्या घोळक्यात रमणार स्वप्नील आज एका मोठ्या झाडा खाली एकटाच येऱ्या झाऱ्या घालत होता . " अरे स्वप्नील , तू इथे एकटाच . आज तू खूप अस्वस्थ दिसतोयस . सगळ ठिक तर आहे ना . " लता त्याच्या जवळ येत म्हणाली .
" मावशी तुम्ही ? " चकीत होत स्वप्नील विचारला . आणि इंकडे तिकडे बघत
" संध्या आली नाही का ? " पुन्हा विचारला .
" ती तर मघाशीच वेणू बरोबर खाली आली . असेल इथच कुठं तरी . कां रे ? " लताने विचारल .
" काही नाही असच . " वरवर हसत स्वप्नील म्हणाला आणि तिथून गेला .
' बाग तर खूप मोठी आहे . आणि लोंकाची गर्दी पण खूप आहे . आता संध्याला कसं शोधायच ? ' हा विचार करत एका बाकावर बसला . स्वप्नील सगळ्यांचा आवडता होता . जो तो त्याला हाक मारून " हा sss य " म्हणत होता . सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते . पण स्वप्नील च मन मात्र उदास होत .