ती गेल्यावर दिपा आणि लता दोघी आल्या .

" अरे नील , तु इथे  एकटा काय करतोयस ? " दिपाने विचारले . "

" मी एकटा नव्हतो . माझ्या बरोबर मित्र होते . ते आत्ताच गेले . "

" हो का ? संध्याला बघीतलस का रे ? " लताने विचारल .

" होय , वेणू बरोबर होती ती . " स्वप्नील म्हणाला .

" बरं तर आम्ही तिकडे पलीकडे कार्यक्रम चालू आहेत . बघायला जातोय . तू ये ना . " दिपा म्हणाली .

" मी जरा नंतर येतो आई . तू जा . "

इतक्यात वेणू आली . " अरे दादा , काय झालं ? संध्याताई कुठंय ? "

" मी तिला ड्रेस दिलय आणि घालून ये म्हणून सांगितलय . खूप उशीर झाला . अजून आलीच नाही . " स्वप्नील अस्वस्थ होत म्हणाला .

" का ऽऽऽ य ? म्हणजे ? " वेणू चकीत होऊन विचारली .

" मी नंतर सांगतो सगळं . आता प्लीज तू जा . " स्वप्नील म्हणाला .

" हो हो जाते . " असे म्हणून वेणू गेली .

ती जाताच संध्या स्वप्नीलकडे आली .

" किती उशीर लावलास . वाट बघून बघून कंठाळा आला . " स्वप्नील म्हणाला .

" सॉरी , पण मला सुद्धा कंठाळा आला . " संध्या म्हणाली .

" तुला कसला कंठाळा आला ? " स्वप्नील वैतागत विचारला .

" अहो , मी तर केव्हांचीच तयार होऊन त्या समोरच्या बोर्डाच्या पाठीमागे उभी होते . आधी मावशी आणि आई नंतर वेणू . मी त्यांच्या समोर मी हा ड्रेस घालून कशी आले असते ? मला लाज वाटत होती . " संध्या लाजत म्हणाली .

" हं ... ! हो का ? " असे म्हणून स्वप्नीलने संध्याला निरखून पाहिले . तेव्हां ती हसून आणखी लाजली . स्वप्नीलही हसला .

" थँक्यू सॉमच संध्या . आज तू माझ्या मनावरच ओझं हलकं केलस . " कृतज्ञेते च्या भावनेत स्वप्नील म्हणाला .

" काहीही हं ... तुम्ही उगाचच मला .... "

" नाही संध्या . मी खरच सांगतोय . तू मला माफ करून , मला माझ्या अपराधी भावनेतून मुक्त केलस . तू आता अशीच राहा . एवढच माझं म्हणणं आहे . " संध्याचं बोलणं मध्येच तोडत  स्वप्नील म्हणाला .

" हो हो , आता तर मी नक्कीच राहीन . आता मला कळलं की , सारी पुरुषं एक सारखी नसतात . पण स्त्री किंवा स्त्री जातीचं आदर करणारे , त्यांचा मान राखणारे पुरुषं फार कमी असतात  . " उदास होत संध्या म्हणाली .

" हं ! संध्या मॅडम भूतकाळ विसरायचं म्हटलं बरं का ? झालं गेलं सोडून , तू आजपासून नव्याने जीवन जगणार आहेस आणि तुझा हा बदल तुझ्या आई - वडीलांसाठी सुखदायक ठरणार आहे . कळलं का ? " स्वप्नील थोडा गंभीर होत म्हणाला .

" हो बरोबर आहे तुमचं . " संध्या स्वप्नीलच्या म्हणण्याला सम्मती देत म्हणाली .

" तुमचं नव्हे तुझं . आपण मित्र - मैत्रीण  आहोत . तेव्हां तू मला नांवाने हाक मारायचं . अहो - जाहो म्हणायचं नाही . ठिके आहे ना? " स्वप्नील म्हणाला .

" ओ के बॉस " असे म्हणून संध्या हसली .

त्यावर स्वप्नीलही हसला .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
pranali godbole

खूप छान लेखन आहे।

abhaysbapat

रूपा मॅडम सर्व भाग वाचले खूप छान

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel