स्वप्नील गायीच पान देऊन घरी आला .

" आई , ए आ ऽऽऽ ई ऽ ऽ " येताच बाहेरूनच त्याने दिपाला मोठ्याने हाक मारली . ती बाहेर आल्यावर

" आई , तू गच्चीतून आमच्या अंगावर फूलं कशाला टाकलीस ? " स्वप्नील वैतागत विचारला .

" अरे नील , कशाला एवढा चिडचिड करतोयस ? " दिपाने विचारल .

" अगं , बिचारी संध्या किती घाबरली माहीतय . " स्वप्नील पुन्हा वैतागतच बोलला .

" अरे मला माहीत नव्हत ती घाबरेल म्हणून . "

" पण आई , का टाकलस ? "

" तुमचा एकमेकांना धक्का लागला आणि तुम्ही तिथेच उभे राहिलात ना म्हणून " दिपा हलकेच हसत म्हणाली .

" म्हणजे ? अगं जाता जाता सहज चकून धक्का लागला . त्यात काय एवढं ? " स्वप्नील म्हणाला .

" मला माहीतय तू तिच्यावर खूप प्रेम करतोयस ते . म्हणून फूलं टाकली . " दिपा म्हणाली .

" मी तिच्यावर प्रेम करतो . हे कुणी तुला सांगितलं ? " स्वप्नील गोंधळून विचारला .

" अरे नील , मी तुझी आई आहे . मी तुला चांगलं ओळखते . "

" आई , वेड्या सारखं काहीतरी विचार करत बसू नकोस . मी तिच्यावर प्रेम नाही करत . " स्वप्नील अस्वस्थ होत म्हणाला .

" दिवाळी सारखा सुरेख सण आणि कुठलाच नाही . आज दिवाळी आहे . निदान आजच्या दिवशी तरी खोटं बोलू नकोस . मला माहितय तुझ सारं . बोल होय ना " मायेने दिपा म्हणली .

" नाही आई , तसं काहीच नाही . आम्ही फक्त फ्रेंडस आहोत . "

" कशाला खरं लपवण्याचा प्रयत्न करतोयस . "

" नाही म्हणजे नाही . मी खोटं बोलत नाही . " स्वप्नीलची अस्वस्थता वाढत चालली होती .

" नाही , तुला माझ्याकडे खरं बोलावेच लागणार .... "

" आई प्लीज ... "

दिपाच बोलणं मध्येच थांबवत स्वप्नील म्हणाला .

" स्वप्नील , आता तर तुला खरं बोलावेच लागणार . शपथ आहे तुला तुझ्या पेटींगची . "

स्वप्नीलची सर्वात जास्त आवडीची वस्तू म्हणजे पेटींग होती . आणि दिपाने त्याचीच शपथ घातल्याने स्वप्नीलचा नाईलाज झाला . त्याची होणारी घालमेल , अस्वस्थता , तळमळ त्याच्या तोंडावरून स्पष्ट जाणवत होती . तो एक सारखा येऱ्याझाऱ्या घालू लागला . शेवटी न राहवून त्याने दिपाला ,

" होय आई , मी प्रेम करतोय तिच्यावर . " म्हणाला .

" आता कसं बोललास , शेवटी कबूल केलासच ना . "  दिपा आनंदाने म्हणाली . अन् मिठी मारली .

" हिप हिप हुर्रे ! हिप हिप हुर्रे ! " असे म्हणून नाचत वेणू बाहेर आली . तिच्या पाठोपाठ गोपालरावही आले .

" आम्ही ऐकलो म्हटलं तुमचं सगळं . " गोपाल रावनेही स्वप्नीलला मिठी मारली . " संध्यावर तुझं प्रेम आहे . हरकत नाही . चांगली गुणी सुसंस्कारीत मुलगी . आम्हाला सून म्हणून स्विकार आहे तिचा . " गोपाल राव आनंदाने म्हणाले .

" चला तोंड गोड करा . " असे म्हणून वेणूने लाडू आणून सगळ्यांच्या तोडांत घातले .

संध्याकाळ झाली . लक्ष्मीची पूजा करून सगळे संध्याच्या घरी गेले . तर तिथेही पूजा चाललेली . सगळ्यांनी देवाला नमस्कार केला . मग गोपाल रावने दामोदररावांकडे संध्याची मागणी घातली . ते ऐकून प्रथम दामोदरराव आणि स्नेहलता दोघेही क्षणभर स्तब्ध झाली . मग संध्याला त्यानी हाक मारून विचारलं . तिने लगेच होकार दिला .

" मी तर खूप आधीपासूनच त्याच्यावर प्रेम करते . आता तर ह्यांनीच मला लग्नाची मागणी घातली . मी तर आज खूप खुष आहे . मी कधी स्वप्नात सुद्धा विचार नाही केला की , स्वप्नील मला लग्नाची मागणी घालेल म्हणून . मला तर वाटायचं की , मी स्वप्नीलच्या लायकीचीच नाही . " ते ऐकून सगळेच चकीत झाले . मग स्वप्नीलने आणलेला गिफ्ट बॉक्स संध्याला दिला . ते घेऊ न संध्या आत गेली . तयार होऊन बाहेर आली . मग त्यांचा साखरपुडा झाला . त्यानंतर संध्या गच्चीत पणत्या पेटवू लागली आणि स्वप्नील तिला मंत्रमुग्ध होऊन बघतच राहिला .

- कथा समाप्त -

लेखिका
रुपा लक्ष्मण रेडकर

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel