" अरे नील , काय झालं ? तू असा इथे एकटा . मी तुला कुठे कुठे शोधतोय . " एक मित्र त्याच्या जवळ येत म्हणाला .

" मन्या , आता तुला मी कसं सांगू ? " असे म्हणून स्वप्नीलने त्याला सर्व काही सांगितल .

" एवढचं , थांब मी तुझं प्रॉब्लम सॉल करतो . " असे म्हणून त्याने एक फोन केला . " मन्या , ती बघ वेणू जातेय . तिच्याच बरोबर होती ती . " स्वप्नील म्हणाला .

" थांब , तु इथेच बस . मी त्या दोघीना  बोलावून आणतो . " असे म्हणून मन्या उठून गेला . पाचच मिनिटात त्याने स्वप्नील समोर त्या दोघांना उभे केले .

" काय दादा , मी तुला शोधून शोधून थकले रे . " वेणू सुस्कारा सोडत म्हणाली .

" कशाला ? " स्वप्नील विचारला .

" कशाला काय ? आमच्या संध्याताई साठी आणि काय ... " असे म्हणून हसून वेणू गेली .

" अगं पण वेणू .... ए sss वेणू " जाणाऱ्या वेणूला स्वप्नील हाका मारु लागला . ती थांबली नाही . मित्रही निघून गेला . राहीली ती संध्या .

" संध्या , तुझं उत्तर काय आहे ? सांग ना बोल ना . .. प्लीज ... " मोठ्या अधीरतेने स्वप्नील विचारला .

ती मान खाली घालून गप्प राहिली . खूप उशीर दोघे बोलेनात . मग संध्या थोडी हिम्मत करून म्हणाली . " होय मी तुम्हाला माफ केलय . " असे म्हणून जाऊ लागली . तोच टाळ्यांचा  कडकडाट झाला . ती दचकून आजूबाजूला पाहू लागली . स्वप्नीलही भानावर येत आजूबाजूला बघीतला तर मन्याने फोन करून ज्यानां ज्याना बोलवलं होतं ती सारी हजर होती .

" संध्या , घाबरू नकोस . इकडे ये . " असे म्हणून आपल्या साऱ्या मित्रांना हात करून बोलावले . आणि " हे सारे माझे मित्र आहेत . अगदी जिवलग मित्र म्हटलं बरं का ? मित्रानो , आजपासून संध्याही आमची मैत्रिण आहे . हिला आपण मदत करायला पाहिजे . " म्हटले .

सगळ्यांनी " हो " म्हणून संध्याशी हात मिळविले आणि निघून गेले .

" हे घे माझ्या तर्फे एक गिफ्ट तुझ्या साठी " स्वप्नील म्हणाला .

" काय आहे ह्यात ? " संध्याने विचारले .

" ड्रेस आहे . चल जा घालून ये . मी इथेच थांबतो . "

" ठिक आहे . " असे म्हणून संध्या गेली .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel