कालच स्वप्नीलच्या राहत्या घराच्या बाजूला नवी भाडोत्री राहायला आली होती . तत्पूर्वी स्वप्नीलने एकदा - दोनदा त्यांना घर साफ करायला आले होते . तेव्हां पाहिलं होतं . छोटसंच कुंटुब . आई , वडिल आणि मुलगी . स्वप्नीलने तर पहिल्या भेटीतच ओळख करून घेतली . श्री दामोदर पार्सेकर आणि स्नेहलता पार्सेकर अशी त्यांची नांवे कळली . पण मुलगीच नांव अजून कळलं नव्हतं . तिला स्वप्नीलने बघीतलं होतं नक्कीच . तीच कां ह्यांची मुलगी ? हे त्याला माहीत नव्हतं . स्वप्नीलच कुंटुबही लहानच आई - वडील आणि दोन मुलं .
स्वप्नीलला पेटींगची आवड होती . वेळ मिळेल तेव्हां पेटींग करायचा . हल्ली सुट्टीचे दिवस असल्याने , त्याचा छंद यशस्वीचं शिखर गाठत होता . एकदा वेणू ( स्वप्नीलची बहीण ) त्याच्या जवळ आली . " दादा , माझं ही पेटींग बनवं ना . " म्हणून हट्ट धरून बसली . त्याच्या आईने ह्याबद्दल मनाई केली होती . म्हणून तो तिचं पेटींग करायला तयार नव्हता . तोच नवी शेजारीण आली . " अरे स्वप्नील , बनव ना पेटींग . आपल्या बहीणीची हौस पुरवायला पाहिजे बघ . उद्या मोठी झाली आणि लग्न करून गेली म्हणजे मग खंत वाटायला नको . "
" मावशी , पण ..... " स्वप्नील काही बोलायच्या आत
" मनाई केलीय आईने होय ना . मला सारं ठाऊक आहे . आता माझं ऐकणार नाही कां ? " असं तिने म्हटल्यावर , स्वप्नील ने नंदी बैलासारखी मान डोलावली .
" वैणी ऽऽऽ ओ ऽ दिपा वैणी ऽऽऽ " स्नेहलताने हाक मारली . त्यासरशी " लता ताई , तुम्ही होय . या ना बसा . चहा करू कां ? " दिपा बाहेर येत म्हणाली .
" नको हो . आम्ही इथे नवखे आहोत . बाजार वैगरे अजून काही माहीत नाही . तुम्ही जर आमच्या बरोबर याल तर फार बरं होईल . "
" हो हो कां नाही . चला ना . " असे म्हणून दोघी बाहेर पडल्या . जाताना स्नेहलताने स्वप्नीलकडे घरची चावी देत , " तुझे काका आले तर ही चावी दे . " असे म्हणून सांगून गेली . स्वप्नीलने चावी घेतली आणि पेटींग करण्यात मग्न झाला . खूप उशीर झाल्यावर , डोअर बेल वाजली . स्वप्नील मनात विचार करू लागला की , ' पप्पा तर कधी बेल वाजवत नाहीत . मग कोण असेल ? अरे हो काकाच . चावी घ्यायला . ' असे म्हणून त्याने दार उघडले . " घ्या काका , तुमच्या घरची सिक्योरिटी . " हसत स्टाईल मध्ये म्हणून स्वप्नीलने चावी दिली . पार्सेकर जाताच तो लगबगीने गच्चीत गेला . तो पर्यंत ते खाली उतरले होते . रस्त्यावर एक मुलगी उभी होती . तिला , " तुला जाऊन चावी घेता येत नाही कां ? सगळ मलाच सांगते ते . एक तर गुडघा इतका दुःखतोय की , चढणे आणि उतरणे अवघड झालय . त्यात तुझे हे असे नखरे . असे दटावत पार्सेकरांनी दरवाजा उघडला . तशी ती धावतच आत गेली . साधारण उंची , लांब सडक केस , बांधेसुद शरीर . पण तोंड निरखण्यातच ती आत गेली . स्वप्नीलने एका नजरेत तिला हेरलं . अजून नांव तरी कुठे कळलं होतं . तो थोडासा घुटमळला . " ए दादा , अजून किती उशीर असं बसायचं ? " वेणू ओरडून विचारली . त्या सरशी स्वप्नीलची तंद्री भंगली .
" हां आलो ऽ आलो " असे म्हणत पेटींग कडे आला . " तुझं पेटींग होत आलय . जरा थांब मुळीच हलू नकोस . " असे म्हणून तो पुन्हा कामाला लागला .
कुलकर्णी आणि पार्सेकर दोन्ही कुंटुंब मध्यम वर्गीय गोपाल ( स्वप्नीलचे वडील ) आणि दामोदर दोघेही बँकेत कामाला होते . हळूहळू दोघांची मैत्री झाली . तर दिपा व स्नेहलताची सुद्धा बरीच गट्टी जमली . पण पार्सेकरांची मुलगी भलतीच अबोल , एकांत प्रिय . एकदा काय झालं ? सकाळची वेळ स्वप्नील गच्चीत शे वींग करत होता . त्याचं लक्ष आरशात बघून दाढी करण्याकडे होतं . तोच बाजूला चाललेली गडबड ऐकू येत होती . " संध्या , झाडून झालं का ? हे बघ मी कपडे धुतलेत , ते वाळत टाक . " असे म्हणून लताने बालदीभर कपडे आणून गच्चीत ठेवले . थोड्याच वेळाने ती गच्चीत आली आणि कपडे दांडीवर टाकू लागली . स्वप्नीलने हळूच वाकून बघीतले . काळी सावळी मुलगी , टपोरे डोळे , लांब नाक , पांढरे शुभ्र दंत पक्ती , केसांचा भला मोठ्ठा आंबाडा मानेवर घातलेला . तिने एकवार स्वप्नीलला पाहिले . " हाय , गुड मॉर्निंग . " तो म्हणाला . पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही . ती गप्प खाली मान घालून गेली . ते बघून स्वप्नीलला कसेसेच वाटले . तो सुद्धा गप्प झाला . अंघोळ न्याहरी वैगरे करून कॉलेजला गेला .
संध्याकाळी लौकरच घरी आला . येताच त्याने पेटींग करायला घेतलं . ते बघून दिपा " अरे नील , हे रे काय ? येतोस काय पेटींग करायला घेतोस काय ? पेटींग करायला घेतोस काय .? सगळं गुपचुप पणे . नाहीतर रोज आल्या आल्या ' आई , भूक लागली . खायला दें ' असे म्हणतोस . तसं आज काही नाही . कॉलेजमध्ये कुणाशी भांडलास का की बरं वाटत नाहीये तुला ? विचारू लागली .
"तसं काही नाही आई . " स्वप्नील पेटींग करत म्हणाला .
" पण आज तुझ काहीतरी बिनसलंय हे नक्कीच " दिपा म्हणाली .
" काही नाही आई , प्लीज जरा तू गप्प बस . " स्वप्नील जरा वैतागतच म्हणाला . त्या सरशी दिपा आत गेली .