तो स्वागत फायटर म्हणाला, "ते दोघेजण बाईक वरून पडूनसुद्धा वाचले आणि आता त्यांनी मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये उडी मारून आसरा घेतलाय. ट्रेनमधले लोक घाबरलेत. टीव्हीवर लाईव्ह दाखवत आहेत! त्यांनी झटापटीत एका पोलिसाची बंदूक  हिसकवली आहे आणि अनेक प्रवाशांना ओलीस धरले आहे!"

"मग हाडवैरी, तुला तिथे जायला हवं, त्यांना वाचवायला हवं. हे काम तूच करू शकशील मला माहित आहे. तोपर्यंत मला मुंबई ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करून काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्यात! तसंच पुढचा प्लॅन आखायचा आहे, आपल्याकडे आता वेळ कमी आहे!"

सध्या डिटेक्टिव्ह त्याच्या साध्या वेशात होता. कारण इतर जगासाठी तो हॉस्पिटलमध्ये होता. सुनिलने त्याच्या जवळ असलेल्या हॅट मधून सूक्ष्म वस्तू काढली, हातावर ठेवली, एक खोल श्वास आत घेतला आणि त्यावर जोराने फूक मारली. झिरको टेक्नॉलॉजीद्वारे ती वस्तू मोठी होऊन हाडवैरीच्या पोशाखात रूपांतरित झाली.

"घे, घाल हा पोशाख आणि वाचव ट्रेन मधल्या लोकांना!"

तो स्वागत फायटर म्हणाला, "ते दोघेजण आता गर्दीत कोणत्यातरी डब्यात लपलेत. त्यामुळे चालत्या ट्रेनमध्ये त्यांना शोधणे अवघड झालेय, असे टीव्हीवर दाखवत आहेत! पोलीस समांतर रोड ने पाठलाग करत आहेत आणि न्यूज चॅनेलवाले पण त्यांच्या मागेमागे आहेत."

सुनिल मिश्कीलपणे म्हणाला, "बघितलं का विशाल! हे सगळे टिव्ही चॅनल सगळीकडे असतांना माझ्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या डिटेक्टिव्हची काय गरज?"

"सर, चांगला जोक होता!", हाडवैरी आणि तो स्वागत फायटर हसायला लागले. ते दोघे पुढे म्हणाले, "आता ती अनघा पुण्याच्या ऑफिसमध्ये बसली आहे आणि बातम्या देत आहे आणि किशोर फिल्डवर आला आहे!"

सगळे हसायला लागले.

 

सुनिल म्हणाला, "ट्रेन थांबवायला सांगा चेन ओढून! सगळीकडे रेल्वे कंट्रोलरला सूचना द्या!"

"नाही! त्यांनी धमकी दिली आहे की ट्रेन थांबवायची नाही. त्यांना खंडाळ्याला उतरायचे आहे. तिथे ते ओलीस लोकांना सोडून देतील!", स्वागत फायटर म्हणाला.

"म्हणजे मला तुमच्या दूरदृष्टीची गरज लागणार त्या माणसाला ट्रेनच्या गर्दीत शोधण्यासाठी!", हाडवैरी म्हणाला.

"ठीक आहे. आपल्या स्पेशल फोनवरून तू माझ्या कायम संपर्कात राहा! मी तुला सांगतो तो कुठे लपला आहे ते!"

हाडवैरी स्वागतच्या एका कारमध्ये मागे बसला आणि ड्रायव्हरला त्याने ही घटना घडत असलेल्या मुंबई हायवेवर न्यायला सांगितले.

इकडे पुन्हा विमानतळावरच्या त्या गुप्त जागी असलेल्या केबिनमध्ये आल्यावर सायली आणि निशाला फोन करून त्याने सगळं सांगितलं आणि म्हणाला, "सायली तुम्हाला नेमून दिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि आता वेळ आली आहे "त्यांना" जागे करून बोलावण्याची!"

"होय", सायली म्हणाली, "जलजीवांना आता जागृत केले पाहिजे!"

सुनिलच्या समोर सायलीने दिलेल्या एका रिपोर्टची फाईल होती, त्यावर लिहिले होते: "जलजीवा: The water demons!"

फाईलकडे बघत तो सायलीला म्हणाला, "मी जलजीवांना जागृत करायला सांगितले आहे आणि लवकरच ते मार्गस्थ होतील! माझे जलजीवांचा प्रमुख अमेय आचरेकरशी बोलणे झाले आहे! त्याला मी एक दिवस आधीच जलजीवांना पाठवायला सांगितले आहे! जेनिफर पण आता जुने वैर विसरली आहे. एवढेच नाही तर ते दोघे आणि जलजीवा स्वागत टीम मध्ये सामील व्हायला तयार आहेत!"

"होय सुनिल, नक्कीच!", सायलीने दुजोरा दिला.

"आणि तुमचे काम लवकर करा. मला शंभर टक्के रिझल्ट पाहिजे!", सुनिलने अधिकारवाणीने सांगितले.

 

"नो प्रॉब्लेम! एकशे एक टक्के रिझल्ट मिळेल!", सायली म्हणाली.

 

काही वेळ सायली करत असलेले काम सुनिलने दूरदृष्टीने पाहिले आणि नंतर मुंबईत रजक डॉक्टरांच्या घराच्या आसपास काय चालले आहे ते बघायला सुरुवात केली. रजक आणि हितेन दोघे अपहरणाचे नाटक करून घरातून निसटून खंडाळ्याला येणार होते.

 

सुपर नेचर बेटावरून निघण्यापूर्वी एक दिवस आधी सुनिलने जलजीवांच्या जागृतीसाठी दोन स्वागत फायटर पाठवलेले होते त्याचेकडून नुकताच निरोप आला होता.

 

जलजीवा लवकरच पुणे आणि मुंबईकडे यायला सुरुवात झाली होती. तसेच पुणे मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या आजू बाजूला सुपर नेचर बेटावरून बोन्साय करून आणलेले ट्री मेन त्याने पेरून ठरवायला सध्या वेशात काही स्वागत फायटर्स पाठवले होते. काही बोन्साय त्याने सायली सोबत मुंबईला पाठवले होते.

 

तिथेही त्यांच्या टीमचे फायटर्स सगळीकडे लवकरच बोन्साय लावणार होते. वेळ आली की सुनिल त्यांना मूळ रुपात आणणार होता म्हणजे त्यांचा उपयोग लढण्यासाठी होईल!

^^^

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Nimish Sonar

आता ही कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे: https://youtube.com/playlist?list=PL3b5C5GmPJolxNZzL9dD2Z54T_L--OSX_

Deepa

please continue to write such amazing stories.

Rujuta

वाह। खूप छान कथा आहे। खरोखर विज्ञान आहे ह्या कथेत आणि रोमांच सुद्धा।

Sayali Raje

कथा फार छान जुळून आली आहे , एका बैठकीत सर्व वाचून संपवली. कथानकाचा मूळ नायक हा एका अर्थाने "दिव्यांग" आहे .

Akshar

Nimish has put a lot of efforts into this book. Must read.

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to डिटेक्टिव्ह निगेटिव्ह


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
खुनाची वेळ
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
गांवाकडच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल
अजरामर कथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत