जया जे वासना ते पुरवीत । आपण तिष्ठत राहे द्वारीं ॥१॥
बळीचिया भावा द्वारपाळ होय । सुदाम्याचें खाय पोहें सुखें ॥२॥
विदुराचें घरीं आवडीं कण्या खाय । हात पसरिताहे भाजी पाना ॥३॥
गौळियाचे घरीं करीतसे चोरी । काला स्वयें करी गोपाळांसी ॥४॥
चोखा म्हणे ऐसा नाटकी श्रीहरी । तोचि हा पंढरी भीमातटीं ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.