गणिका अजामेळे काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावता ॥१॥
नवले हें पाहा नवल हें पाहा । अनुभवें अनुभवा देहामाजी ॥२॥
उच्चारितां नाम वैकुंठींचें घेणें । ऐसें दुजें पेणें आहे कोठें ॥३॥
ब्रह्महत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥
उफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥
चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धारा अधमा स्त्री शुद्रा ॥६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.