सप्रेमे निवृत्ति आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलचरणीं ॥१॥
सोपान सांवता गोरा तो कुंभार । नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥
कबीर कमाल रोहिदास चांभार । आणिक अपार वैष्णवजन ॥३॥
चोखा तयां पायीं घाली लोटांगण । वंदितो चरण प्रेमभावें ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.