देहीं देखिली पंढरी । आत्मा अविनाश विटेवरी ॥१॥
तोहा पांडुरंग जाणा । शांति रुक्मिणि निजांगना ॥२॥
आकारलें तितुकें नासे । आत्मा अविनाश विठ्ठल दिसे ॥३॥
ऐसा विठ्ठल ह्रुदयीं ध्यायीं । चोखामेळा जडला पायीं ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.