अवघ्या साधनांचें सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥
येणें घडे सकळ नेम । वाचें नाम जपतांचि ॥२॥
भाग्यें होय संत भेटी । सांगूं गोष्टी सुखाच्या ॥३॥
चोखा म्हणे मज आनंद झाला । जीवलग भेटला मायबाप ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.