महादोषराशि पापाचे कळप । नामें सुखरुप कलियुगीं ॥१॥
म्हणोनि आळस करुं नका कोणी । नाम जपा वाणीं सर्वकाळ ॥२॥
आसनीं शयनीं नामाचा आठव । आन ठावाठाव करुं नका ॥३॥
चोखा म्हणे खातां जेवितां वाचे । नाम श्रीविठ्ठलाचें उच्चारावें ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.