ज्या कारणें वेदश्रुति अनुवादती । तो हा रमापती पंढरीये ॥१॥
सुखाचें ठेवणें क्षीरसागर निवासी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥२॥
भाविका कारणें उभवोनि हात । उदारपणें देत भुक्तिमुक्ती ॥३॥
न पाहे उंच नीच याती कुळ । स्त्री शूद्र चांडाळा सरते पायीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला । म्हणोनि स्थिरावला भीमातटीं ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.