निगमाचे शाखे आगमाचें फळ । वेद शास्त्रा बोल विठ्ठल हा ॥१॥
पुराणासी वाड योगियांचें गुज । सकळां निजबीज विठ्ठल हा ॥२॥
निगम कल्पतरु भक्तांचा मांदुस । तोहा स्वयंप्रकाश विठ्ठल हा ॥३॥
चोखा म्हणे तो तूं जगाचे जीवन । संताचें मनरंजन विठ्ठल हा ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.