आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण । वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥
आगमाची आठी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥
योग याग तप अष्टांग साधन । नकळेची दान व्रत तप ॥३॥
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझें ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.