उतरलें सुख चंद्रभागेतटीं । पाहा वाळुवंटीं बाळरुप ॥१॥
बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचें सुख ब्रह्म ॥२॥
जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्त्रां ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.