आपण निरनिराळया धार्मिक पंथाकडे दृष्टी फेकू या. हे धर्मपंथ जगाची काही सेवा बजावीत नाहीत का? काहीच थोर व उदार सेवा जगाची काहीच सेवा बजावीत नाहीत का? काहीच थोर व उदार सेवा करीत नाहीत का?त्यांच्यापासून शिकण्यासारखे, घेण्यासारखे काहीच नाही का? असे नाही. हे पंथ कितीतरी काम करतात. काम करतात. प्रत्येक पंथ म्हणजे जणू भ्रातृसंघ असतो. पंथ म्हणजे सर्व अनुयायांचे घर, आधारस्थान. पंथ म्हणजे अनुयायांची प्रेमपुरी. कोणी आजारी पडला, विपत्तीत सापडला, दारिद्रयाने गांजला तर पंथ त्याच्या मदतीस धावतो. पंथाचे इतर लोक त्याला एकटा उघड पडू देणार नाहीत. कोणावर सामाजिक हल्ला झाला. उपहास झाला, तर पंथातील इतर सारे त्याची बाजू घेऊन धावतील. कारण त्या एकाच्या यशात, अब्रुरत, कल्याणात सर्वांचे यश, अबु्र व कल्याण साठवलेले असते. राकाचा झगडा तो सार्यांचा, एकाचे दु:ख ते सार्यांचे जैन, पारशी, ज्यू, शीख या लोकांच्या पंथात असले बंधुतेचे स्वरूप दिसून येते.
पंथ म्हणजे आधारस्थान, त्याचप्रमाणे पंथ म्हणजे शाळाही असते. आपल्या अनुयायांच्या, मुलांबाळांच्या शिक्षणाची तरतुद करणे हे पंथांचे काम असते. पंथाचे ध्येय हेच पुढे त्या मुलाचे ध्येय व्हावयाचे असते. मुले पंथ; वृक्ष वाढणार्या शाखाच त्या, ते ध्येयच त्या मुलांचा भावी ठेवा, त्याचे ते वारसदार व्हावयाचे असतात. यासाठी पंथाची शिस्त, पंथाचे विचार, पंथाची तत्वे लहानपणापासूनच मुलांच्या मनात बिंबवणे जरुर असते. मुले म्हणजे पंथाचे नवयुवक. मुलांना तत्वनिष्ठ शिपाई बनविणे हे पंथाचे काम असते.
आपल्या अंगातील गुण, आपल्या अंगातील कौशल्य, आपली करामत प्रकट करण्याचे स्थान म्हणजे आपला पंथ हेच होय. पंथात सार्या सवलती मिळतात, स्वातंत्र्य असते. आपापल्या पंथाचा आधार असल्यामुळे प्रत्येकजण जीवनात उत्साहाने उडी घेतो. त्याला इतरांचा आधार व पाठिंबा असतो. नैतिक पाठबळ असते. मी एकटा ukही. ही भावना हृदयात असते व म्हणून तो निराश होत नाही, तो दुबळा दिसत नाही. पंथातील प्रत्येक अनुयायाने अधिकात अधिक कार्य करून दाखवावे. अशी पंथाची अपेक्षा असते. पंथ म्हणजे जणू माता. आपल्या अनुयायांना, आपल्या पुत्रांना ही पंथ माता सांगते. ''या बच्चांनो, भरपूर कौतुक करते, काम करा. '' काम करून पुत्र आला म्हणजे ही पंथ;माता त्याचे स्वागत करते. आपल्या मुलाचे प्रत्येक कृत्य पंथ;माता नमूद करून ठेवते व स्वत:चा इतिहास रचित असते. भावी पिढीला हा पूर्वइतिहास सेवेचा व त्यागाचा इतिहास मिळावा अशी तरतूद करण्यात येते. पंथातील कोणी तरुण परदेशात साहस करण्यासाठी जर गेला, नवीन विद्या, नवीन कला हस्तगत करून घेण्यासाठी जर गेला, तर तिकडे त्याला मित्रमंडळी भेटतील, साहाय्य करतील, अशी व्यवस्था पंथ; माता करीत असते. पंथ म्हणजे माता, पंथ म्हणजे सखा; पंथ म्हणजे गुरू पंथ म्हणजे सेनापती, पंथ म्हणजे पथदर्शक, पंथ म्हणजे ध्येय, पंथ म्हणजे झेंडा, पंथ म्हणजे सारे. असा हा पंथ कोण अवमानील? पंथ म्हणजे पाप, घाण व भांडण असे कोण म्हणेल? हिंदुस्थानातील निरनिराळया जाती म्हणजे जणू पंथच आहेत! या दृष्टीने जर जातीकडे बघू तर किती छान होईल! दुसर्याचा मत्सर न करता स्वत: उन्नत होणे यात वाईट काय आहे?
परंतु पंथाचे शेवटचे ध्येय पंथातील होणे हे आहे. ही गोष्ट विसरता कामा नये. आपल्या पंथाच्या बाहेर जे आहेत त्यांच्याजवळ काही सत्य नाही. ते सारे नास्तिक, काफरच आहेत असे म्हणणे म्हणजे घोर पातक आहे. हा फार मोठा प्रभु-द्रोह आहे. आर्यसमाज, ब्राम्होसमाज, स्त्रीशिक्षणसंस्था, राष्ट्रीय शिक्षण मंडळ, मद्यपानप्रतिबंधक मंडळ. भारत सेवक समाज, मजूरमंडळ-नाना संस्था असतील. परंतु यामुळे भिऊन जावयास नको, चिडून जावयास नको. प्रत्येकाने दुसर्यांनाही स्वातंत्र्य द्यावे व स्वत:चाही विकास करावा. जो माझा खरा विकासच नव्हे. दुसर्याच्या विकासाच्या आड येणारा माझा विकास हा माझा होऊ शकत नाही. हा धर्ममय विकास नाही. 'मीच तेवढा खरा' यासारखे असत्य जगात दुसरे नाही. प्रत्येक क्षणी आपण देवाच्या न्यायासनासमोर उभे आहोत या भावनेने वागले पाहिजे. तुम्ही कितीही मोठे कार्य केलेत, कितीही तुमची स्तुतिस्तोत्रे गायिली गेली, कितीही तुमची पाठ थोपटली गेली, तरी शेवटी तुम्ही जे केले ते कोणत्या वृत्तीने हाच महत्वाचा प्रश्न आहे.