या प्रश्नाच्या उत्तरावरच तुमच्या केलेल्या कार्याचे मोल अवलंबून राहील. स्वत:च्या कामाचे एकंदर सार तुम्ही काय काढता यावर त्या कार्याची थोरवी, महत्ता व सत्यता अवलंबून आहे. ''माझेच करणे व माझेच म्हणणे खरे होते व आहे. बाकी सारे चूक'' असे तुम्ही मरणशय्येवर म्हणणार का? ''मला प्रकाश मिळाला त्याप्रमाणे जगात जो जो जन्मालायेतो त्यालाही मिळतच असतो'' असे म्हणाल? ईश्वर आपल्या कोणत्याही लेकारांना अंधारात पाठवीत नाही, आंधळे करून पाठवीत नाही, प्रत्येकाच्या हृदयमंदिरात दिवा लावूनच तो प्रत्येकाला पाठवीत असतो. अंतरीचा ज्ञानदिवा सर्वांजवळ आहे.
''जगात येणार्या प्रत्येकाचा मार्ग त्याचा प्रकाश उजळीत असतो'' हे थोर शब्द भारतातील एका थोर संताच्या मुखातून बाहेर पडलेले आहेत. '' मलाच काय ते सत्य कळते'' व ''सर्वानाच सत्य कळते'' या दोन वृत्तीतील यथार्थ कोणती हयाबद्दल दुमत असणे शक्य नाही. कोणत्याही पंथाला सत्याचा वारसा दिलेला नाही. ईश्वराच्या घरची रास सर्वांच्याच मालकीची आहे. त्या सत्यधनाचे सारे वारसदार आहेत. ते सत्यधन कोणा एकाचेच वतन नाही. या जगात कोणालाही स्वत:च्या एकटयाच्या बळावर तरुन जाता येणार नाही. एकमेकांना मिळालेले सत्याचे किरण जर एकमेक आदराने घेतील तरच सर्वाच्या मार्गातील अंधार दूर होऊन पाऊल टाकण्यापुरता प्रकाश मिळेल, अखेरचा सर्वसंग्राहक विशाल पंथ म्हणजे मानवजात. सर्व पंथ मानवजातीच्या पोटात सामावतात. कोबडीच्या पंखाखाली सारी पिले जमतात. त्याप्रमाणे अखिल मानवजातीच्या पंखाखाली सारी पंथ;बाळे शेवटी येतील. भगवान बु) म्हणत, ''जिवाला ज्या ज्या गोष्टीने म्हणून जीवन मिळेल, सत्यत्व, शिवत्व व सुदरत्व मिळेल, तेते सारे मानवजातीने आपल्या महा पंथात, महाभवनात अंतर्भूत करून घेतले पाहिजे.''
ज्याप्रमाणे पंथ आपल्या अनुयायांची अहोरात्र काळजी वाहणारे मायबाप बनत, त्याप्रमाणे आज प्रत्येक खेडे होऊ द्या. पंथ म्हणजे निराधार भक्तांचा आधार, घरदार नसलेल्यांचे घर, पंथ म्हणजे ज्ञान देणारी शाळा, पंथ म्हणजे भ्रातृप्रेम. प्रत्येक खेडे आज असे होऊ द्या. प्रत्येक खेउयांतील लोकांस परस्परांबद्दल जिव्हाळा वाटो, परस्परांबद्दल प्रेम वाटो. पंथ ज्याप्रमाणे सर्वावर कृपा करणारी माता, त्याप्रमाणे भारतदेश ही आपली सर्वांची माता, पंथानुयायी एकमेकांचे बंधू असत तसे आपण ग्रामवासी एकमेकांचे बंधू होऊ या. धार्मिक पंथ एका विशिष्ट सत्यासाठी उभा राही. आपण आपल्या स्थानासाठी , आपल्या गावासाठी, भारतवर्षासाठी उभे राहू या. वसाहत करावयास निघालेल्या आपल्या प्राचीन आर्यपूर्वजांनी जेथे जेथे त्यांना पवित्र जागा दिसली तेथे तेथे त्यांनी होमशाळा बांधल्या, पवित्र अग्नी प्रज्वलित केला. प्रत्येक घर, प्रत्येक खेडे, यज्ञ भूमीच, पवित्र भूमीच वाटू दे. आपली घरे, आपली मंदिरे, आपली खेडी, आपली नगरे, आपला प्रांत आपला देश, सर्वाच्या रुपाने ती विशाल व थोर सृष्टिमाताच नटली नाही का?तो परमे९वरच या अनेक रुपांनी उभा नाही का?एकाच दिव्य सत्याची ही सारी रुपे असे भारतीय हृदयास वाटत नाही का?एकाच सूर्याचे हे सारे किरण, एकाच महान सिंधूतील हे पवित्र बिंदू, असे भारतीय हृदयास आज अनुभवता येत नाही? या विशाल व रमणीय भारतमंदिरात जमलेली आपण सारी मुले म्हणजे भाऊ भाऊ नाही का? आपण एकत्र येणार नाही का? बंधुप्रेमाने बळकट एकत्र बांधले जाणार नाही का? परस्परांच्या विकासासाठी शक्य तो त्याग करणार नाही का?