• प्लॉटचा आकार चौकोनी, आयताकार असावा. इतर आकार शक्यतो टाळावा.
  • कोपरा नसलेलेले प्लॉट घेऊ नयेत. असे प्लॉट लाभकारक नसतात.
  • प्लॉटची माती भुसभुशीत नसावी, तिचा रंग पांढरा किंवा तांबूस असावा. प्रथम थोडी जमीन खोदून पाहावी. माती मुरमाड असावी. तिचा गंध सुखकर असावा.
  • जमिनीत मृत शरीर अवशेष किंवा अस्थी नसाव्यात.
  • जमिनीला वेढणारे रस्ते नसावेत. जमिनीपाशी येऊन थांबणारे रस्ते नसावेत.
  • सभोवतालचा परिसर प्रसन्न असावा.
  • जमीन खोलगट नसावी. जवळपास स्मशानभूमी, वेश्यालय, मदिरागृह, जुगार अड्डे असू नयेत.
  • प्लॉटसमोर मंदिराचे प्रवेशद्वार नसावे.
  • पूर्व अथवा ईशान्य वा उत्तर दिशेला नदी, तलाव वा जलकुंभ असल्यास उत्तम.
  • प्लॉटमध्ये पाण्याची टाकी, हौद, बोअरिंग वा विहीर ईशान्य दिशेस असावी.
  • विद्युत वाहिनी, खांब आदी आग्नेय दिशेला असावेत.
  • जमिनीच्या मध्यभागी खड्डा नसावा.
  • प्लॉटचा आकार योग्य नसल्यास तो चौरस किंवा आयताकार करून घ्यावा. असे करताना ईशान्य कोपरा वाढवावा. जमिनीचे योग्य आकारात विभाजन करताना थोडे नुकसान होऊ शकते, पण पुढील अशुभ परिणाम टाळण्यासाठी हे केले पाहिजे. उर्वरित जागेत तुम्ही फुलझाडे वा शोभिवंत झाडे लावू शकता.
  • नवीन बांधकामासाठी सर्व साहित्य नवीन असावे. जुने, वापरलेले साहित्य वापरू नये. नवनिर्मिती ही संपूर्णपणे नवीन असली पाहिजे.
  • जागेची उपलब्धता, गरज आणि आर्थिक गणित योग्यरीत्या बसवावे.

ही वास्तू घेण्याअगोदरची किंवा बांधण्याअगोदरची काळजी आहे. यापेक्षा सखोल विश्लेषण करता येऊ शकते; परंतु किमान वरील काळजी घेतली पाहिजे. दोष उत्पन्न होण्यापेक्षा दोष टाळलेले केव्हाही उपयुक्तच असतात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel