“जयंता, तूं पास होशीलच; पुढें काय करणार तूं ? तुझा मोठा भाऊ तर चळवळींत गेला. तुझ्या मनांत काय आहे.” वडिलांनीं विचारलें. चळवळीचा भर ओसरला आहे. माझे तिकडे लक्ष नाहीं. मी लहान मुलगा कोठें जाणार ? परंतु मला खूप शिकायची इच्छा आहे.”

“कॉलेजचा खर्च कसा भागवायचा, बाळ ?”

“बाबा, मला नोकरी मिळेल. मला चांगले मार्क्स मिळतील. कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीहि कदाचित् मिळेल. कॉलेजच्या शिक्षणाचा तुमच्यावर भार पडणार नाहीं.”

“तुझ्या शिक्षणाचा खर्च मला करावा लागणार नाहीं असें धरलें तरी तुझ्याकडून घरसंसार चालवायला मदत थोडीच होणार आहे ? अरे, मी एकटा किती काम करूं ? मी थकून जातों. सरकारी नोकरी. शिवाय सकाळीं खासगी नोकरी; महिनाअखेर दोन्ही टोकं मिळायला तर हवींत ? घरांत तुम्हीं पाचसहा भावंडें. तो मोठा गेला देशसेवेला. बी.ए. होईल, मदत करील, अशी आशा होती. परंतु घरीं न सांगता गेला. जांऊ दे. देशासाठीं कोणी तरी जायला हवेंच. परंतु तुम्हांला कसें पोसूं ? जयन्ता, तूं नोकरी धर. रेशनिंगमध्ये मिळेल; मी बोलून ठेवले आहे.” वडील म्हणाले.

“मी पंधरा वर्षांचा; मला कोण देईल नोकरी ?”

“तेथें वयाची अट नाहीं. मॅट्रिक पास असलास म्हणजे पुरे. अरे कोंवळ्या मुलीहि काम करतात.”

इतक्यांत जयंताची बहीण तेथें आली ती म्हमाली, “बाबा, मी करूं कां नोकरी ? जयन्ताला शिकूं दे. तो हुषार आहे. मला द्या ना कोठें मिळवून.”

“अग, तूं मॅट्रिक नापास; शिवाय तुझी प्रकृति बरी नसते.”
“नोकरी करून सुधारेल. आपला कांहीं उपयोग होत आहे असें मनांत येऊन समाधान वाटेल.”
“असें नको बोलूं. तूं शीक. हुषार आहेस. तूं मोठा होशील, खरेंच जयन्ता!”
“मला खूप शिकावेंसें वाटतें.”
“शीक हो; परंतु प्रकृतीस जप.”

“नको गंगू, तूं नको नोकरी करूं. आम्हा भावांना तूं एक बहीण तूं बरी हो. तुझें वजन वाढूं दे. मी करीन नोकरी. सकाळी कॉलेजात जाईन. हजारों मुलें असे करीत आहेत.”
“परंतु तूं अशक्त; तुला एवढा ताण सहन होईल का ?”
“मनांत असलें म्हणजें सारें होतें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel