एक नामच हरी
एक नाम हरी द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥
समबुद्धिनामांत श्रीहरी समान होतो
समबुद्धी घेतां समान श्रीहरी । शमदमावरी हरी झाला ॥२॥
देहादेही आणि सर्वा घटीं सहस्त्ररश्मी सुर्यप्रकाश एक रामच आहे.
सर्वाघटीं राम देहादेही एक । सुर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ॥३॥
ज्ञानेश्वरमहारांजांचे चित्तांत हरिपाठाचा नेम असल्याने ते मागले जन्मीच मुक्ती झाले.
ज्ञानदेव चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलीया जन्म मुक्त झालो. ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.