ज्यांची अनंत पापें गेलीं आहेत अशा वैष्णवांनीं नामसंकीर्तनाची जाड केली.
नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी । पापें अनंत कोडी गेलीं त्याची ॥१॥
अनंतजन्माचे तप एक नाम असुन सर्व मार्गात हरिपाठमार्ग सुगम आहे
अनंता जन्माचे तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठ ॥२॥
योगयागादि सर्व हरिपाठांत लयाला गेले.
योगयागक्रिया धर्मधर्म माया । गेले ते विलया हरिपाठ ॥३॥
हरिवाचुन नेम नाही.
ज्ञानदेवी यज्ञयान क्रिया धर्म । हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.