नित्यनेम नामीं तो दुर्लभ असुन त्याच्याजवळ लक्ष्मीवल्लभ वास्तव्य करतात
नित्यनेम नामीं तो प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तयाजवळी ॥१॥
नारायण हरिनामाचा जप करणार्याचे घरीं चारी भुक्तीमुक्ती असतात
नारायण हरि नारायण हरि । भुक्तिमुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥
हरि वांचुन जन्म तो नरक असुन जन्मलेला प्राणी यमाचा पाहुणा होतो
हरिविण जन्म नरकवि पै जाणा । यमाचा पाहुणा प्राणी होय ॥३॥
निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरमहाराजंना गगनाहुन वाड नाम आहे असें सांगितले.
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । गगनाहोनि वाड नाम आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.