ऋतुजाच घर आलं .... घराच्या समोर कार पोहचताच ती श्री ला म्हणाली ,

" थांबवा .... आलय माझं घर very very thanx तुम्ही नसते आलात तर अद्यापही

मी तिथेच थंडीत कुडकुडत बसलेली असती सरीना झेलत .... "

तिला गोड स्माईल देतं ,

" सांभाळून जा ! " एवढच म्हणतं त्याने गाडी सुरू केली .....

गेट उघडून आत शिरतचं ऋतुजा स्वतः शीच पुटपुटली ," संभाळून जा म्हणे ..... हं

ह्या वाक्याची गरज तर मला नसून त्यांना होती ..."

ऋतुजाचे घरात पाऊल पडताचं ,

" काय हे ऋतुजा कुठे थांबली होती एवढ्या पाऊसात अंग आशुतोष कधीचा कॉल करतोय तुला

रिसिव्ह करून सांगायच तरी , आम्ही किती टेन्शन मध्ये होतो इकडे माहितीये तुला ?? "

किचन मधून स्वयंपाक आटोपून हॉल मध्ये प्रवेश करतच तिच्या आईने आपलं बोलणं

सुरू केलं ...

" अंग आई आली ना आता घरी मी जाम भुक लागली आहे मला काहीतरी खायला दे !

पोटात कावळे ओरडून राहिलेत माझ्या .... "

ऋतुजा बाहेरून येऊन थकून गेली होती सोफ्यावर पडतचं ती आईला बोलत होती ..

" आता आपण सर्व जेवन करून घेऊ .... बेटा तू आता आमच्या सोबत जेऊनच घे ! "

तिचे बाबा रूमच्या बाहेर येत केशवराव तिला म्हणाले आणि त्यांनी लगेच जेवणासाठी

आशुतोषलाही आवाज दिला .....

Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel