श्री आणि ऋतुजाच्या प्रेमचर्चा आता घरातही दोघांच्या माहिती झाल्या विरोध नव्हताच
त्यांच्या प्रेमाला .....
गंधर्व विवाह करण्याची इच्छा ऋतुजाला आधी पासून होती तिच्या स्वप्नातला राजकुमार तिला आता
आपल्या महलात काही दिवसांनी घेऊन जाणार होताच .... तद् पुर्वी आशुतोषच लग्न
करण्याची घरच्यांची इच्छा होती ...
आशुतोषच्या वडिलांनी आपल्या एका मित्राला शब्द देऊन ठेवला होता .... तुझ्या दोनमुलीतून
एक मुलगी मी आशुतोषसाठी मागणी घालणारं म्हणून .... आणि त्याला आशुतोषही वडीलाच्या मर्जी
पलीकडे जाऊन विरोध नव्हता दर्शवू शकतं ....
आशुतोषला लग्न करायचं नव्हतचं लग्न करण त्याच्या मनातही नव्हतं ....
पण वडीलासमोर त्याचं काय चालणारं ....
आईने त्याला मुलीचा लिफाफ्यात फोटो दिला आणि म्हटलं ,
" आशु बेटा बघं मुलगी छान आहे ... दिसायला पण डॉक्टर आहे तुम्ही दोघं मिळून
क्लिनिक चालवू शकता .... "
आशुतोष ऐकत होता तिकडून त्यांचे पप्पा आले ते म्हणाले ,
" बेटे आशुतोष मेरे बचपन का वो जिगरी दोस्त है अब दिल्ली मैं रहता खुदका मकान है उनका दिल्ली
मैं और यहा भी भाई अब एकही लडकी है उनकी कल वो सब तेरा ही होने वाला है हमारे पास भी क्या
कमी है ! "
आशुतोष काहीच न बोलता तो फोटो घेऊन आपल्या रूम मध्ये गेला .... फोटो टेबलावर ठेऊन
दिला त्यांने दोन तीन तासाने रूमच्या बाहेर आला तेव्हा आईने त्याला विचारले ....
" आशु कशी वाटली मुलगी आवडली ना ! "
आशुतोषने फोटो बघितलाही नव्हता फोटो न बघताच तो बाहेर आल्यावर आईच्या बोलण्यावर
म्हणाला ,
" छान आहे मुलगी ...."
तो आई पासून सुटकारा मिळवण्यासाठी तिथून लवकर जायला निघाला तरी आईने त्याला
थांबवून शब्द बंधणात अडकवलेच आणि हळूच म्हणाल्या ,
" आज ज्याचं आहे बेटा रात्री आपल्याला मुलीकडे ..... "
आशुतोष ठिक आहे म्हणून निघून गेला .....