रात्री सहा वाजता आशुतोषचे आई बाबा तो सोबत ऋतुजाही होतीच सर्व मुलीच्या घरी गेले ....
आशुतोषला तर वडिलाचं कटपुतली बनुन ते सांगतात तसं ऐकत होता त्यांच्या मर्जीसाठी तो
तिथे गेला ..... बैठकीत मुलगी ट्रे घेऊन यायच्या आधीच तिच्या आणि आशुतोषच्या लग्नाचा
विषय निघाला .... आशुतोषला तिटकारा वाटत होता तिथे गेल्याचा .
ऋतुजा तिथून उठली आणि किचन मध्ये गेली .... तिथे मुलीची आई होती ...
तिथे जातच ऋतुजा म्हणाली ,
" नमस्कार काकू वहिणीसाहेब कुठे आहेत आमच्या तयार झाल्या नाहीत का अजून ....."
मुलीची आई ऋतुजाला म्हणाली ,
" बेटा आहे ती रूम मध्ये झालीच तयार घेऊन जा ना तुझ्या वहिणीला बैठकीत ....."
ऋतुजा मुलीच्या रूममध्ये गेली .... तिचा स्वभाव ऋतुजाला फार आवडला अर्धातासतच दोघी जणू
मैत्रिणी झाल्या बैठकीत जाताना ती ऋतुजाला म्हणाली माझं लग्न करण्याची इच्छा नाही पण , बाबांनी
तुमच्या बाबांना शब्द देऊन ठेवला होता आणि बाबाच्या मतापलीकडे ह्या घरात काहीच चालत नाही ..."
ऋतुजाला ही ऐकून जरा वाईटच वाटलं ....
मुलगी बैठकीत आली तरी आशुतोष वर मानकरून मुलीकडे बघायला तयार नव्हता
ती बैठकीत आली तेव्हा .... आशुतोषला थंड गारवा अंगारा भेदून गेल्याचा भास झाला
जणूकाही त्यांची आराध्या तिथे येऊन गेली असावी ....
मुलीला मध्यस्ती म्हणून ऐकांने प्रश्न विचारायला सुरूवात केली ... सर्व प्रथम त्यांनी नाव विचारलं
" तुझं नाव काय ? "
तिने उत्तर दिलं .....
" आशना ....."
हे नाव ऐकताच आशुतोषने वर मान केली तो तिच्याकडे बघू लागला ती तिच होती .... डॉ . आशना
आराध्याची बहिण आशना ..... आशुतोषला तिच्यात गुलाबी रंगाच्या साडीवर त्यांची आशना दृष्टिस पडत
होती ह्याच साडीत आशुतोषने कॉलेज प्रोग्राम मध्ये आराध्याला पाहिले होते ते आराध्याचे फोटो
आजही आशुतोषच्या फोन मध्ये सेव होते ..... सेम आराध्या दिसत होती ती फरकच काय होता त्याच्याच !