आशुतोष अधून मधून श्री ला कॉल करत असायचा .... आजही दोघांची मैत्री

घट्टच होती ....!!

काही गैरसमजूतीमुळे त्याच्यातजो दुरावा आला तो प्रत्यक्षात भेटल्यानंतर नाहीसा

झाला ... ऋतुजा आणि श्रीचा प्रेमाबद्दल आशुतोषला साधी मनकही नव्हती लागली पण एक दिवस

ऋतुजा घरी उशिरा आली ... आणि त्याच रात्री सात वाजता आशुतोषला ती श्री सोबत कॉफीशॉपवर

दिसली आशुतोष तिथून घरी निघून आला आणि ऋतुजा घरी येण्याची वाट बघू लागला ...

त्यांनी ही गोष्ट घरात कुणालाच नाही सांगितली नऊ वाजता ऋतुजा घरी आली .. आणि आपल्या रूम

मध्ये जाऊन बसली ...

आशुतोष तिच्या रूम मध्ये गेला ....

" ऋतुजा , काय म्हणते श्री ? "

आशुतोष असं डायरेक्ट श्री बद्दल विचारतोय हे ऐकून ती घाबरलीच .....

" कक् काय दादा ....." जरा घाबरतच ती प्रतिउत्तर देते .

आशुतोष तिच्या समोर बसतो ..... आणि तिच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणतो ,

" अगं ऐ ऋतू भावापासून लपवायला लागली का आता तू ऐवढी मोठी झालीस मला सांगू पण

नाही शकतं .. आज बघितलं मी तुला श्री सोबत तसं श्री माझा बेस्ट फ्रेन्ड आहे पण तुमच्यात

प्रेम प्रकरण कधी पासून ?? "

दादा आपल्या प्रेमाला विरोध करणारं म्हणून ती धास्तावलेलीच होती तरी तिने सर्व काही खरं

खरं सांगून दिलं आणि म्हणाली .....

" ये दादा सॉरी तुला माझा राग आला का ? तू म्हणशील त्याचं मुलाशी मी लग्न करील रे

पण मी श्री वर खुप प्रेम करते मीच त्याला प्रपोज केलं होतं तू प्लिज रागवू नको ना ! "

आशुतोष जरा रागातच बघत तिला म्हणाला ,

" त्याच्या सोबत प्रेम केलं आणि मला तू सांगितलं देखील नाही .... उद्या पप्पांना सांगते मी हे

सर्व थांब तू आणि ऐक ...."

डोळ्यात पाणी आणतच ती म्हणाली ,

" दादा तू म्हणशील ते करील रे प्लिज पप्पाना नको सांगू ना .....'

आशुतोष परत रागात म्हणाला ,

" माझी ऐक शर्त तुला ऐका लागेल ....."

ती म्हणाली ,

" हं बोल दादा ......"

आशुतोष तिचा हात हातात घेत म्हणाला ,

" ऋते तुला श्री सोबतच लग्न करा लागेल .....ही माझी शर्त ..."

डोळ्यात तिच्या आनंद अश्रू ओघळायला लागले ....

" थँक्यू दादा ....." म्हणतं तिने त्याला मिठ्ठी मारली ....

" दादा मला वाटलं तू विरोध करणारं माझ्या प्रेमाला ......"

ह्यावर आशुतोष म्हणाला ,

" प्रेम तू करते त्याच्यावर मी भाऊ झालो तुझा म्हणून तुमच्या प्रेमाच्या आड यायला कोण गं विरोधाभासा

पेक्षा तुमचं प्रेम श्रेष्ठ असतं ....."

®®®

Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel