खरं तर कोड्यात फसल्यागत वाटतं होतं आशुतोषला ती सेम त्याच्या आराध्यासारखी
दिसणारी कोण होती ? हे आशुतोषलाही ठाऊक नव्हते त्याने तर तिला बघितलेही नव्हते ...
आशुतोष आणि श्री दिल्लीत पोहचले .... तिथे पोहचताच ऐअरपोर्टवर पराग त्यांना कारने
घ्यायला आला .... आशुतोष आणि पराग एकमेकांसोबत बोलण्यापासून अलिप्तच होते .
परागने आपली कार ती मुलगी ज्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर होती तिकडे वळवली .
" श्री आपण सर्वप्रथम त्या हॉस्पिटल मध्ये जाऊ , माझं बोलणं खोट नव्हतं प्रत्यक्षात बघितलं
मी तिला माझ्या डोळ्याने ....."
पराग बोलला ....
खरं काय खोट काय हे श्रीला माहिती नव्हतं आराध्या हे जग सोडून गेली हे त्याला आशुतोष कडून
रात्रीच माहिती झाले ... आणि पराग सांगतो त्याला तो ज्या हॉटेल मध्ये मुक्कामाला होता तिथे त्याने
डिनर हॉल मध्ये आराध्याला पाहिले ....
किती गुंतागुतीचं ....
" तिला बघितल्यावरच उलगडा होईल आता .." श्री बोलला .
तिने हॉल मध्ये परागला आपले नाव आणि हॉस्पिटलचा पत्ता सांगितला होता . त्याच पत्त्यावर पराग श्री
आणि आशुतोषला त्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला ....
हॉस्पिटल समोर कार उभी केल्यावर वैतागून श्री परागला म्हणाला ,
" पराग हे हॉस्पिटल समोर का गाडी स्टॉप केली ... "
" ती ह्याच हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहे म्हणून ..... " पराग कारचा दरवाजा उघडतच म्हणाला .
तिघेही त्या हॉस्पिटल मध्ये पोहचले .... परागने तिथल्या एका सिस्टरला डॉ. आशना बद्दल विचारले .
सिस्टरने त्यांना बसायला सांगितले ...
" सॉरी सर , आशना मँडम operation theatre मध्ये आहे . दहा मिनिटांनी बाहेर येतीलच तुम्ही इथे
बसून वेट करू शकता ..."
त्यांना बसायला सांगून सिस्टर निघून गेल्या ... आशुतोष तर सारखा ती कधी येईल म्हणून चारही दिशा
धुडाळून बघत होता ...
दहा मिनंटाचा अर्धा तास झाला .. सिस्टरने तिला बाहेर येताचं सांगितले तुम्हाला कोणीतरी
भेटायला आले म्हणून तशीच ती वेटिंग रूमकडे गेली ...
तिला येतांना बघून आशुतोष बघताच क्षणी भाबावून गेला तडक तो आपल्या जागेवर उभा रहाला ...
ती जवळ येत पर्यत तो तिला बघतच राहिला .... पुतळ्या सारखा स्तब्ध आशुतोष हालचाल न करता
तिला न्याहाळत उभा होता ... तिचीही नजर आशुतोषच्या चेहर्यावरून हटत नव्हती ....
श्री ला तर वाटलं ही आराध्याच असावी .... परागकडे बघत ती उद्गारली ,
" तुम्ही इथे का आले त्या दिवशीच मी सांगितलं ना तुम्हाला मी कोणी आराध्या नाही ...."
आशुतोषला ही काय बोलावं तिच्याशी सुचत नव्हतं श्री मध्ये बोलत म्हणाला ,
" आशुतोष सांग तुझी आराध्याही अशीच दिसायची ना ! फोटो दाखव ह्यांना तुझ्या आराध्याचा ..."
आशुतोष खिशातून फोटो काढत तिला देत म्हणाला ,
" आराध्याही माझी अशीच दिसायची पण तिला मी माझ्या डोळ्यासमोर जळतांना बघितलं ...."
फोटोकडे बघत ती म्हणाली ,
" मी सुद्धा तुमच्या मित्राला हेच सांगण्याचा प्रयत्न केला मी कोणी आराध्या नाही डॉ. आशना आहे ..."
डोळ्यातले अश्रू पुसत ती जायला निघाली ....
❄❄❄❄