श्री मिंटीग हॉल मध्ये पोहचताच त्याला समोर चेअर वर ऋतुजा बसलेली दिसली ..

तिला बघून त्याच्या चेहर्यावर जो आनंद ओसरून वहात होता तो बघण्यासारखाच होता .

त्याच्या चेहर्यावरचे भाव ऋतुजा पासून लपले नाही ...

तो येताना बघून सर्व उभे झाले फॉर्मेलीटी म्हणून ऋतुजालाही उभं व्हावचं लागलं त्याच्या समोर

" हँलो सर , माय सेल्फ ऋतुजा ईनामदार .... हे आमच्या अॉफीसचे तीन मेंमबर आहेत ."

ती समोर काही बोलेल तोच तिला थांबवत श्री म्हणाला ," आय नो ... मिस् ऋतुजा प्लिज टेकअ सिट .."

श्रीने प्रोजेक्ट बद्दल सविस्तर माहिती दिली ...

अर्धा तास मिंटिग चालली . आता हा प्रोजेक्ट पुर्ण होईपर्यत श्री आणि ऋतुजाची भेट रोजचीच ठरली

होती आठवड्याचा रविवार वगळला तर ....

श्री जेव्हा PPT वरून प्रोजेक्ट एक्सप्लेन करून सांगत होता तेव्हा ऋतुजाच त्याच्या हावभावांकडे

हातवार्यांनकडे ऐकूनच काय तर ती श्रीच्या प्रत्येक हालचालीकडे निरखून बघणं श्री सुद्धा तिच्याकडे

चोरून लपून बघतचं होता .... प्रेजेन्टेश्न संपल सर्व हॉलचा बाहेर पडले .

सर्व चाय कॉफी घेण्यात व्यस्त होते पण ऋतुजाचं कुठेच मन लागत नव्हतं ती एंकातात बसली होते

कोण जाने तिच्या मनात काय चालू होतं . तिला घुसमट होत होती . घाबरल्या सारखं वाटतं होतं तिचा

मनाला वाटलं आपल्याला ह्या अॉफीस मधला कर्मचारी फॉलो करतो आहे . ती त्या सर्वापासून लांब रहात

होती तो तिच्या जवळ येण्याचा अधिक प्रयत्न करतं होता . त्याचं नावही ऋतुजाला माहिती नव्हतं .

श्री च्या अॉफीस मध्ये पहिल्यादा प्रोजेक्ट तिच्या बॉसने डिल केलं होतं आणि ही त्याच्यासाठी सुवर्ण संधी

होती , पण ऋतुजाला तिथे मात्र uncomfortable फिल होत होतं ....

तो कर्मचारी ही त्याच्याच टिम मधला होता ज्याला श्रीनेच त्याच्या टिम मध्ये पार्टिसिपेट करून घेतलं

होतं ... त्याची येता जाता सारखी नजर आता ऋतुजावर होती . ऋतुजाला भिती वाटायला लागली होती .

तिला वाटतं होतं की आपण जाऊन श्री सरांना सांगाव तो मला फॉलो करतो आहे म्हणून ...

पण सांगणार कसं त्याचं तर नावही तिला माहिती नव्हतं ... शिवाय कोण विश्वास करेल माझ्यावर ?

ह्याच भितीत तिचा अख्खा दिवस गेला . सहा वाजले तिला घरी निघायचं होतं .

पार्किंग मध्ये गाडी ठेवलेली होती अॉफीसच्या मागे . शिवानीला अँटोने जायचं होतं म्हणून ती निघून

गेली . ऋतुजा पायर्यावरून चालतं असताना आपल्या मागून तिला कोणी येत असल्याचा भास होत होता

समोर त्या व्यक्तीची सावली तिला पछाडत होती .

ऋतुजा जशी पायरी उतरून खाली पाऊल ठेवतच तिचा पाय घसरला तर मागून कोणी तरी येत

तिला पडताना हात धरून सावरलं

ऋतुजा चक्क घाबरलीच . परत मागे जिण्याच्या दिशेने बघू लागली . आपल्या समोर $श्री ला बघून

तिने त्याचा जवळ जातच ..... " सर कोणीतरी मला फॉलो करतं आहे ."

म्हणून रडू लागली .... " अरे हे बघा असं रडू नका प्लिज कोणी नाही आहे तुम्हाला भास होतो आहे . "

श्री तिला समजवतच म्हणाला ....

" नाही सर , कोणीतरी आहे तो ... तो मिंटीग संपून बाहेर आली तेव्हापासून माझ्याकडे बघत आहे

वाईट नजरेने . " आधी श्रीला तर काही समजलच नाही ही कोणाला म्हणते आहे .

" ऋतुजा अगं तू हे काय बोलते आहे माझ्या अॉफीस मधलं कोणी आहे का ? तू सांग मला फक्त कोण

आहे तो ? "

" सर तो तुमच्याटिम मधला मेंमबर आहे उंचसा थोडा दिसायला सावळा ..."

" कोण .... शरद बद्दल बोलतं आहे का तू आठ दिवस झाले तो कामाला लागून त्याचं प्रोफेशन बघून

मी ठेऊन घेतलं काल मला मालती कडून ही त्याच्याबद्दल कम्पलेन्ट आली ... त्याचं काही तरी करावचं

लागेल .... "

ऋतुजाला धक्काच बसला ...."मालती कोण ? आणि तिला पण तो फॉलो करत असून तुम्ही

त्याला अजून पर्यत काढून नाही टाकलं काही वाईट होण्याची वाट बघत आहात का तुम्ही ? "

रागाच्या भरात ऋतुजा बोलून गेली ...

" नाही ऋतुजा .... मालती आपल्या अॉफीस मधल्या client आहेत . त्या म्हणे मला त्या शरदच

reputation काही योग्य वाटतं नाही सारखा अॉफीस मधल्या तरूणीकडे येता जाता बघत असतो तो ."

ऋतुजा म्हणाली ," सर प्लिज त्याला उद्या काढून टाका तुम्ही तो उद्या मला इथे दिसला तर हा जॉब मी

रिजाइन करेल .."

शरद तिला समजावतच म्हणाला ,

" हो relax ..... प्लिज ! माझा नंबर नोट करून घ्या काही अडचण आली तर कॉल करा मला ओके ,

ड्रॉप करून देऊ तुम्हाला घरपर्यत ??"

आपल्या स्कुटीकडे बघतच ऋतुजा म्हणाली ," नाही स्कुटी आहे निघते मी ..."

ह्या एक महिण्यात ऋतुजा हळूहळू श्रीचा प्रेमात पडत होती .... आता दोघात छान मैत्री झाली होती

दोघही तासनतास फोनवर गप्पा करतं रहायचं रात्र रात्र फोनवर चाटिंग चालायची झोप कशी लागायची

दोघानाही कळायचं नाही .

☺☺☺

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel