आशुतोषने रूम तर सोडली आता जायचं कुठे म्हणून एक रात्र तो हॉटेल वर काढतो ...
आराध्या त्याला कॉल करून करून त्रस्त होते . आशुतोषलाही काहीच सुचत नाही तिला
हो म्हणावं की नाही नेमक करावं काय विचारची ससेहोलपट झालेली ...
त्या रात्री तो रात्रभर झोपला नाही ... श्री पण त्याला सारखा कॉल लाऊन बघत होता पण ,
त्याला प्रतिउत्तर मिळत नव्हते आशुतोषने त्याचा नंबर ब्लेकलिस्ट मध्ये टाकला .
दुसर्यादिवशी मित्राच्या मदतीने त्याला कॉलेज जवळच रूम मिळाली ... तिथून तीन
महिण्यानी त्याने आराध्याला भेटायला बोलवले एका कॉपी शॉपमध्ये ती आली ....
दोघेही असे बाहेर कॉपीशॉप मध्ये एकांतात तीन महिण्याने भेटत होते ... बाहेर पाऊसाच वातावरण
मेघ एकत्र जमले सरीने बरसायला सुरूवात केली तसा आशुतोष आराध्याचा हातपकडून
कॉपीशॉपचा आडोशाला घेऊन गेला पाऊस मुसळधार येत होता त्या दोघाना भिजवत होता
जोराच्या विजा कडकडायला सुरूवात झाली ...
आराध्याला विजाची खुप भिती ... एक जोराची विज कडाडली आणि आराध्याने भिऊन
आशुतोषचा शर्टला गच्च पकडूनच घेतले लाहाणशा बाळासारखी ती आशुतोषला घट्ट पकडून होती
तिचे ओले झालेले केस आशुतोषचा गालाला स्पर्शुन जातं होते
ओठावरून सळसळत पाणी भिजलेल्या पापण्याचं चुंबन घ्यायावं असं आशुतोषचा मनात आलं
ढग गडगडायला लागले त्या आवाजाने भानात येऊन आपण कुठे उभे आहोत ह्याची प्रत्यक्षात जान
होताच आराध्या आशुतोष पासून दुर झाली ... ती आशुतोषला म्हणाली ,"
आशु तुझा होकाराच्या मी किती प्रतिक्षेत राहू ?? "
आशुतोष तिच्यापासून नजर लपवत म्हणाला ," तुला वाईट वाटेल पण , मी तुझा एक मित्र होतो
त्या पलीकडे मला कुठल्याही नातेसंबंधात अडकवू नको प्लिज ....."
पावसाच्या बरसणार्या सरीच्या आवेशात आराध्याचे अश्रूही सळमिसळीत झाले होते .....
पण ते तिच्या डोळ्यातले अश्रू त्याला दिसतं नव्हते .... ती काही न बोलता तिथून जायला
निघाली ....
आशुतोषने लगेच तिचा हात पकडुन घेतला .....
" सोड माझा हात आशु ....."
त्याला खरचं प्रेमाच्या बंधनात अडकायचं नव्हतं पण , तो तिला होकारही देऊ शकतं नव्हता ,
" घरी जाऊन तू खुप रडणार हो ना आराध्या ....."
" तुला काय त्याचं ..... एवढं , नाही म्हणून माझं मन तोडल ना ! मिळालं मला माझं उत्तर ..."
" आराध्या मित्र म्हणून रहा ना !"
" अरे पण मी प्रेम करते तुझ्यावर ..... तुला कसं समजावू माझं प्रेम तुला मी मेल्यावरही कळणारं
नाही ....."
भरपाऊसात मरणाच तिच्या तोंडून नाव ऐकून आशुतोष तिला एक थापड मारतो ...
" तू वेडी आहेस का आराध्या ......."
त्याला कवटाळत .... " हो हो हो .... आशु मी तुझ्यासाठी वेडी आहे अरे ! "
तिला दुर सारत आशुतोष म्हणाला ," प्रेमाच हे वेड सोडून दे मी इथे शिक्षणघेण्यासाठी आलोय
तुझ्यासोबत अय्याशी करण्यासाठी नाही . "
आशुतोषचा स्वभावच असा होता आधी तर त्याने आराध्याला काही कालावधी मागितला होता ...
नंतर तिला सांगितलं फक्त मित्र म्हणून रहा ... त्याला आराध्याचं प्रेमच स्विकारायचं नव्हतं
तर त्याने श्री आणि इतर त्याचे रूममेटस ह्याच्या सोबत काही न बोलता समजून न घेता बाहेर पडायला
नको होते ....
आशुतोष नंतर कॉलेज संपूर्ण झाल्यावरही कधीच आराध्या सोबत बोलला नाही ती मात्र त्याचा
सोबत बोलण्याचा प्रयत्न करत होती आणि हा सततचा तिला टाळतच राहिला ... त्यादिवशी कॉलेजची
चार वर्ष संपून फेरवेल पार्टी आयोजित केली होती .....
पार्टीत आराध्या लाल कलरचा गाऊन घालून आलेली होती त्यावर वाईट डायमन्ड इअररिंग तिने
लावलेले होते ... तिचा गौरवर्ण चेहर्यावर तो पेहराव शोभून दिसत होता ... पार्टीत सर्व मुलांची नजर
तिच्यावर रोखून धरत होती ...
आशुतोषचा मनात येऊन गेलं शेवटचं वर्ष संपल कॉलेजही पण इथून काहीच सोबत येणार नाही
आपल्या शिवाय इथे घालवलेल्या आठवणी !
आज ह्या पार्टीतच मी आराध्याला प्रपोज केलं तर माझ्याकडून किती जिवापाड प्रेम करते ना
ती आपल्यावर आता ही करतच असेल ....
म्हणून तो ती उभी असते हातात ज्युसचा ग्लास धरून तिथे तिच्या जवळ जाऊन
आपल्या गुढघ्यावर वर बसत तिचा उजवा हात हातात घेत सर्वाचा समोर म्हणतो ,
" आय रियली ल्व यू सो मच आराध्या ......"
आराध्याला आकाश ठेगणं वाटायला लागते सारं जग तिच्या सोबत असल्याचे भास आभास
रंगून जातात ती ह्याचं क्षणाची वाट बघत बसलेली असते ....
🌷🌷🌷
पण ,
नियतीला त्याचं उमलेलं प्रेमपुष्प बहरू द्यायचं नसते .....
प्रेमात बहरणं म्हणजे जग प्रेममय होणं त्या प्रेमात सुख दुख: आप्तस्वकीय सर्वाचा वाटा
त्या प्रेमाला कुणाची नजर लागावी आणि अजणं फासत पापण्यांच्या कडेला गतकाळची उघड्या
डोळ्याने पाहिलेली स्वप्ने अश्रूधारे सोबत वहात जावी ....
असचं काही झालं आशुतोष आणि आराध्याच्या सोबत !!
आराध्याला गर्भाशयाचा कँसर झाला .... हे खुप उशिरा कळलं आणि जेव्हा कळलं
तेव्हा खुप उशीर झाला होता ....
आराध्या जग सोडून निघून गेली आशुतोष आजही तिच्याच आठवणीत जगतो तिच्याच प्रेमसागरात
स्वतः ला झोकून घेतं ती इथेच कुठेतरी आपल्या सोबत आहे म्हणून तो एकांतात तिच्या फोटोसोबत
गप्पा मारत बसलेला असतो .... प्रेम हे असतचं असं ! रडवणारं हसवणारं कधी कधी सोडून गेल्यावर
विरह यातनेत दुखाचे हेलकावे देणारं ......
आशुतोषला वाटलं आपण आधीजे तिला बोललो त्यावर ठाम असतो तर आज एवढा स्वतः ला त्रास
नसता झाला ... पण , माझ्या होकाराने तिचा जीव सुखावला तिची इच्छा अधूरी नाही राहिली
तिने केलेलं प्रेम पुर्ण झालं ....
आता ती निघून गेली ह्या प्रेम वाटेवर आशुतोषला एकट्याला सोडून पण तो एकटा नव्हताच मुळी
दोघातला एक निघून गेल्यावर प्रेम संपत असं कुठे बधिस्त आहे ... ते चिरकाल त्याच्या सोबत जगतच
असतं ...