पराग श्री च्या संपर्कात होताच . पराग आज आयआयटी मध्ये प्राध्यापक म्हणून रूंजू होता .

काही अॉफीसच्या कामासाठी त्याला दिल्लीला जाण्याचा योग आला .

आजही तो आराध्याचा शोधात होता तिला सॉरी म्हण्यासाठी ... त्याचा एकट्याचा चुकीमुळे दोन

मित्र दुरावले होते ... त्या मित्रांना त्याला एकत्र हसताना एका पलेटेमध्ये खाताना बघायचं होतं सर्व

राग रूसवे विसरून ...

आणि हे सत्य आशुतोष पर्यत आराध्याच पोहचवू शकणारं होती .. पराग दिल्लीत येऊन

पाच दिवस झाले तो एका फायस्टार हॉटेल मध्ये थांबलेला होता ... त्या रात्री त्याला तिथे सेम

आराध्या सारखी मुलगी दृष्टीस पडली ... तो आपल्या मेंमबरसला समोर पाठवून त्या खुर्चीकडे

वळला ती मुलगी आपल्या मैत्रीनींन सोबत तिथे डिनरला आली होती .

दिसायला आराध्या सारखीच सेम डोळे तिचेचं उंची वर्ण सारखाच .... आता तर त्याला खात्री

झाली ही आराध्याच आहे ... पाच सहा वर्षा पुर्वीची आराध्या जशी होती सेम तशीच होती ती ..

विंलब न करता पराग तिच्या टेबल जवळ गेला ... तिच्या जवळ जातच तो म्हणाला ,

" हँलो आराध्या , ओळखल मला ? "

ती उभी होतच म्हणाली ,

" कोण आराध्या ? "

" अरे तू आरध्या आहे ना ! विसरलीस का ? बरं आशुतोषला नसेल विसरली . हे बघं तुमचं काय चालयं मला काही करायचं नाही पण माझं ऐकून घे ती चिठ्ठी मी तुला लिहीली होती श्री ने नाही
घाईत मी खाली माझं नावं लिहायचं राहून गेलो ...."

परागला थांबवतच ती म्हणाली ,

" हँलो मिस्टर , मी कोणी आराध्या नाही जेजे हॉस्पिटल मध्ये मी एक सर्जन आहे ....

डॉ . आशना .... समजलं ! निघा आता ....."

परागने त्या हॉस्पिटलच नाव नोट केलं तिच्याकडे बघतच तो तिथून आपल्या रूम मध्ये गेला ..

**********

श्री नुकताच ऋतुजा सोडून घरी आला आणि आपल्या बेडवर जाऊन खिशातली चिठ्ठी हातात

घेऊन खोलतच तर त्याचा फोन वाजला ऐवढ्यात .....

ओहहहह नो हटट् आता कुणाचा कॉल असावा . त्याने फोनकडे बघताच परागच नाव स्क्रिन वर ...

" हं बोल पराग ...."

" अरे श्री आज मला आराध्या दिसली होती ...." तो खरं तेच सांगत होता पण श्री त्याचा विश्वास

बसेना .

" अरे वा आशुतोष सोबत होती का मग ती .... बोलला का तू तिच्या सोबत ."

पराग त्याला सांगू लागला ,

" ती बोलली की मी आराध्या नाही डॉ. आशना आहे ....."

श्री पण बुचकड्यातच पडला आता ...

" आशना नामकरण केलं की काय तिने ... आणि तुझा चशम्याचा नंबर तपास एकदा .."

" अरे श्री मी खरं सांगतोय ती आराध्याच होती . तिने तिचा हॉस्पिटलच नाव पण सांगितलं

तू ये यार इकडे ताबडतोब ...."

" जस्ट चील डाउन यार ! आशुतोष सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करतो मी ... प्लिज वेट माय

कॉल ...."

श्री ने ऋतुजाची चिठ्ठी आपल्या पाकेट मध्ये ठेवली आणि ऋतुजाला कॉल केला ...

ऋतुजा त्याच्या होकाराच्या प्रतिक्षेत बसलेली होती ... त्याचा कॉल येताच तिच्या चेहर्यावर हास्य

फुलले तिला वाटलं श्री ने आपला स्विकार केला ....

पण , फोन उचलताच श्री चा घाईचा सुर ऐकून तिला काही कळू नाही लागलं ...

" ऋतुजा अगं मला लवकर आशुतोषचा नंबर दे ! "

ऋतुजा वाटलं श्री माझ्या लेटर बद्दल दादाला सांगण्यासाठी त्याचा नंबर मागतो आहे .

'' श्री अरे मला घरच्याना आताच नाही सांगायचं आहे आपल्या बद्दल...."

श्री ने त्याच्या पाकिटाकडे बघितलं ते लेटर अजून त्याने वाचलेल नव्हतं तिचा बोलण्यावरून त्याला

लेटर मध्ये काय लिहील़ असावं हे समजलचं ...

" अगं ऋतुजा मी आपल्या बद्दल नाही बोलत आहे तुझ्या भावासोबत मला म्हत्त्वाचं काम आहे ...

तुला सर्व नंतर सांगतो मी समजावून प्लिज दे यार नंबर वेळ कमी आहे माझ्याकडे ....''

ऋतुजाने कॉनट्याक्ट लिस्ट मधून नंबर काढला ,

" हं लिहं ..... "

" ओके ऋतुजा नंतर बोलतो मी तुला ... बाय tc ! "

असं म्हणतं श्री ने फोन ठेवला ....

बाहेर पाऊस रसरसून बरसू लागला ढगात गडगडाट सुरू झाला विजा कडाडत होत्या ...

श्री ने आशुतोषचा नंबर डायल केला .....

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel