श्री ........ त्या विचारकक्षेतून जागा झाला . आशुतोष भेटलाच कधी तर सांगू त्याला
समजवून म्हणतं ... पण , आराध्या जग सोडून गेली हे त्याला ही माहिती नव्हतं .
सुर्य उजाळला पहाटेचे पाच वाजताच आज ऋतुजाचा फोन वाजू लागला ...
ट्रिंग ट्रिंगगगगगगग ट्रिंरीरीगगगगगSssssssss एवढ्या सकाळी आलाराम वाजायला
लागला म्हणून ऋतुजाने फोन हातात घेतला तर तिच्या बॉसचा कॉल येतच होता ......
ओहहहहहहह नो " मिस्टर गोजावळे "
डोळे चोळतच तिने कॉल रिसव्ह केला ....
" हँलो सर , हं बोला ना ! काही काम होतं का ? "
" ऋतुजा मँडम , मी फॉरेन टुरवर काही दिवसासाठी जातं आहो आज आपले ३ client
घेऊन तुम्ही W4 अॉफीसला जा त्याच्या सोबत नवीन प्रोजेक्ट कालच मी साईन केला आहे .
त्यांची सर्व जबाबदारी मी स्वतः सांभाळली असती मला हे म्हत्त्वाचं काम नसतं तर ,
ते काम आता मी तुम्हाला सोपवलेलं आहे .... तिथे मदतीला तुम्हाला वरिष्ट मिळतीलच
काम योग्य रित्या समजून जाणीव पुर्वक करा काही अडचण भासल्यास मला कॉल करा ...
ठेवतो मी ....."
" सर सर पण ......" ऋतुजाच बोलणं ऐकून न घेता बॉसने फोन कट केला .
नवीन प्रोजेक्ट W4 अॉफीस तर खुप मोठं आहे . तिथले वरिष्ठ आपल्या सोबत कसे Behavior
करतील ह्याचं काळजीत ऋतुजा पडली .. तिने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण तिला झोप काही
येईना ...
तिने घडीकडे बघितलं तर साडेपाच वाजले होते . कोणी तिच्यासोबत बोलायलापण जाग
नव्हतं ....
ती तडख उठली आणि आशुतोषचा रूम मध्ये गेली .. रूम मध्ये किरर्ररर्र अंधार
पसरलेला होता झिरो लाईटचा उजेडही नव्हता रूम मध्ये प्रवेश करताच तिने
लाईट अॉन केले ....
" दादा दादा उठना ..... उठ लवकर ."
आशुतोष चिडतच तिला म्हणाला ,"
ये बावळट ऋते झोपू दे ना मला काय दादा लावलं ...." अस्वस्थ होतं ऋतुजा म्हणाली ,
ओके जाऊदे ....सॉरी झोप तू ."
ऋतुजा अस्वस्थ झाली आहे हे तिच्या आवाजावरून कळताच कशाचाही विलंब न करता
झोपेत खोंळबा करतं आशुतोष उठला आणि तिला म्हणाला ," अगं माझी माय काय झालं
तुला एवढं नाराज व्हायला ..... हं सांग बघू आधी मला ! "
जरा लटक्या स्वरातच ऋतुजा त्याला सांगायला लागते .....
," अरे दादा बॉसचा कॉल आला होता नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करायचं आहे म्हणाले अॉफीस
माहिती आहे कुठलं ते W4 ..."
तिला समजवतच आशुतोष म्हणाला ," अरे यार तू पण ना गं उगाच टेन्शन घेते
अजून तिथे जायचीच आहे .... तुला तर खुश व्हायला पाहिजे त्या अॉफीस मध्ये तुला तिथल्या
लोकांसोबत काम करण्याची संधी मिळते आहे ..."
आता कुठे आशुतोषने तिच्या चेहर्यावरील काळजीच सावट दुर केलं ... ऋतुजाचा चेहर्यावर हास्य
फुललं ....
☺☺☺