निर्मला ऐन तारुण्यात आली. तिच्या वयानं अठरावं पूर्ण केलं. नागीणीनं कात टाकावी अशी तिची कांती चमकू लागली. तारुण्याचा ठसा तिच्या अंगाअंगावर दिसू लागला. वय लग्नाचं, तसं पाहिलं तर तिला अनेक हुण्यांनी हुंडा न घेताही पळवून नेलं असतं. पण आडव आलं ते तिच नशिब!
अथणी गाव तसं खेडच. पण माणसाला देव धर्माच भक्तीच फार वेड. निर्मलाची आई यल्लामा आईची जोगतीण होती म्हणून जे दुख जोगतीणीच्या वाटयाला येत, ते तिच्याही वाटयाला आलं होत. तिने आपली पहिली मुलगी देवीला देवदासी म्हणून अर्पण करणार अशा समजुतीने तिने निर्मलाला देवीच्या हवाली केली.
निर्मलाला अठरावं लागल्यापासून तिच्या मनात काळजी होती. पोरीचं भविष्य तिच्या डोळ्यासमोर दिसत होतं. म्हातारपणाकडे झुकलेल्या डोळ्यात आसवं दाटत होती. पण इलाज नव्हता. आपण देवदासी आहोत याची निर्मलाला कल्पना नव्हती, तरी ती इयत्ता सातवी पास झाली होती, नंतर शाळा सोडून दिली. घरची कामे करु लागली.
गावात खेळण्यात बागडण्यात तिचं आयुष्य गेलं. कशाचीही काळजी नाही, चिंता नाही. भविष्याचं स्वप्न नाही, पण तिच्या मनात आपला नवरा कसा असेल याची स्वप्ने ती पाहू लागली. पण सर्व स्वप्ने खरी होत नाहीत. निर्मलाचेही स्वप्न भंग पावलं.
एकदिवस तिची आई तिला म्हणाली "निर्मला या पंधरवड्यात तुझं उरकून टाकायचं असे आम्ही ठरविले." पण आई......"निर्मला म्हणाली. "पण नाही अन बीन नाही." आई म्हणाली.
निर्मला लाजून चूर झाली. आपणास पाहूणे तर बघायला आले नाहीत. कदाचित एखाद्या राजकुमाराने आपणास चोरुन पाहीले असेल. आपलं रुप यौवन त्याच्या नजरेत भरले असेल आणि तो न सांगताच आपणास घेवून जाणार असेल.
एक ना अनेक विचार तिच्या डोक्यात थैमान घालू लागले. पण आपलं लग्न होतयं हक्काचा नवरा मिळतोय. प्रेम करणारा, माय करणारा, हट्ट पुरविणारं कोण तरी आपलं म्हणणारं माणूस मिळतयं याचाचं तिला आनंद होत होता.
कसलाही असावा. पण बाईच्या जातीला धनी असावा. कुंकवाशिवाय बाईच कपाळ शोभून दिसत नाही. गळ्यात मंगळसूत्र असले की बाईला बंधन असतं.
लग्नाचा दिवस उजाडला. सगळी तयारी झाली निर्मलाला सर्वाच्या चेहर्यारवर आनंद, पण निर्मलाच्या आईच्या चेहर्याूवर मात्र सुख आणि दुःखाचे मिश्रण.
निर्मला आपल्या होणार्याप नवर्या्ला शोधत होती. तिचे डोळे इकडे तिकडे भिरभिरत होते. पण दुर्दैव, तिचं लग्न देवाशी लावण्यात आलं. निर्मला देवदासी झाली.
निर्मला रात्रभर आईच्या गळ्यात मिठी मारुन ओक्साीबोक्सी् रडली. रडून रडून तिचा गळा सुकला. डोळ्यातलं पाणी आटलं. तरीही तिला ओरडून विचारावसं वाटलं होत की, ‘‘आई, तू हे असं का केलसं! माझ्या संसाराचं स्वप्न असे वार्याचवर का उधळलसं! मी कोणता गुन्हा केलाय म्हणून ही शिक्षा दिलीस. इतरांसारखं जीवन जगण्याची संधी मला का नाही? जीवन एकदाचं मिळतं. मग मी मरेपर्यंत कसं जगायचं. कसं राहायचं. आई तू गेल्यावर माझ्या भविष्याचं काय? मी रानोरान अशीच भटकत राहणार काय? मला आधार तो कोणाचा? अशा कितीतरी मी देवदासी पाहिल्याआ आहेत की त्यांच आयुष्यर उध्वस्त् झालेलं पाहिलं आहे. मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे. मला आयुष्यात काहीतरी करायचं होत.’’
माझा जन्मच कशासाठी झाला? का आत्महत्या करु? निर्मलाचं मन दुखावलं गेलं. जीवन स्विकारणे माणसाला जमतं, पण मरण माणसाच्या हातात नसतं.
निर्मलाच्या डोक्यावर दुसर्याा दिवशी जग ठेवण्यात आला. ती देवीचं नाव घेवून घरोघरी फिरू लागली. लोक तिच्या पाया पडू लागले. मेळा तयार झाला. अनेक गावच्या कार्यक्रमाच्या सुपार्या येऊ लागल्या. लोक तिला न्याहळू लागले. निर्मलाची आई म्हा तारपणाकडे झुकली होती. आणि ही ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर येवून उभी होती. प्रत्येक गावातलं तरुण पोरं गावातला म्होचरक्यार तिच्याकडं एकटक पाहायचा.
आणि एक दिवस तिला एका श्रीमंताची शेज सजवावी लागली. तिला तरुणपणाचा अर्थ समजला. सुखाची कल्पमना आली. काही पैशासाठी तिने आपलं सर्वस्वथ दिलं. तारुण्य अर्पण केलं आणि तेव्हापासून ती दुसर्यारची होऊ लागली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्यात आलं होतं.
स्त्रीच्या गळ्यात फक्त मंगळसूत्र असलं की तिला हक्काचा पती असतो. पण मंगळसूत्राच्या जोडीला देवीच्या नावानं मोती बांधला की स्त्रीीला हक्काणच असं कोणी मिळतचं नसतं.
त्यासतून निर्मला खोट्या आशा बाळगून आज ना उद्या आपणाला मनापासून प्रेम करणारा, संसार करणारा व आपल्यासोबत राहणारा एक माणूस मिळेल असं वाटलं. माणसं मिळाली ती तीच्या तारुण्याचा, सुंदर देहाचा उपभोग घेण्यापुरतीच.
वाहणार्याा पाण्याला बांध असावा लागतो. निर्मलाच्या वाहणार्या तारुण्याला बांधच नव्हता. त्यामुळे पाणी वाट मिळेल तिकडे पळू लागलं. एकदा सैरभैर झालेलं मन पुन्हा एका ठिकाणी थांबेल हे नक्की सांगता येत नाही.
स्त्री ही आदीमाया शक्ती आहे जीवनाचे सार आहे, आधार आहे. तिच्यावर संपूर्ण जग अवलंबून आहे. हे कोणीही मान्य करेल. कारण स्त्रीरची रुपे अनेक आहेत. प्रथम स्त्रीे नंतर माता, बहीण, पत्नीध, प्रेयसी, मैत्रीण, विरांगणा....कितीतरी रुपे सांगता येतील.
तिच्या मनाला भावना असून कधीही बांध घालता आला नाही. ती कोणत्या वेळी काय करेल हे सांगणे कठीण. कधी जीवापाड प्रेम करेल, कधी दुष्मनी, माणसाला कधी मार्गावर आणेल तर कधी जीवनातून उठवेल. प्रेम, त्याग, बलीदान हे सर्व तिच्या ठायी एकवटलेलं असतं.
खरं म्हणजे स्त्रीमुळेच पुरुष शोभून दिसतो. पुरुषाचा अलंकार स्त्री आहे. स्त्री शिवाय हे माय मोहाचे जीवन व्यर्थ आहे. यासाठी स्त्रीचा सन्मान केला पाहीजे. मीरासारखी भक्ती करणारी स्त्रीच आहे. राधासारखं प्रेम करणारी स्त्रीच आहे. कल्पना चावला, किरण बेदी, फुलनदेवी यासगळया स्त्रीयाच आहेत.
प्रत्येक क्षेत्रात काम करणार्याा स्त्रीमुळेच जीवनाचा नित्यक्रम अहोरात्र अखंडपणे व्यवस्थीत चालू आहे.
त्यापैकी निर्मला ही एक होती. सगळयाचं देवदासींच्या वाट्याला वेगवेगळ्या प्रकारची दुःखे येत असतात.
दिशाहीन माणसाला किनारा लागेलच असं सांगता येत नाही. माणसाला दुःखापाठोपाठ दुःखच येतं. सुख येत पण ते मधाच्या थेंबाप्रमाणे असतं. काही क्षण माणसाला आनंद देतं. त्यापमुळं माणसाच्या आशा पालवतात. तो जगण्यासाठी धडपडतो. त्या एका मधाच्या थेबासाठी पुन्हा जगतो. पण वाट्याला येतं ते दुःखचं!
वाटतं देवानं सुख निर्माणच केलं नाही. पण माणूस मात्र नाही ते शोधण्यासाठी आयुष्यभर धडपडतो.
जीवन म्हणजे तरी नेमक काय? कोणालाही सांगता येत नाही. मात्र गीतेत सांगितल्याीप्रमाणे कर्म करीत राहायचं. जगताना एकएक दिवस मरणाकडे जायचं. एक दिवस सगळं सोडून जायचं. मग या जगात यायचं तरी कशासाठी? अवघड आहे. विचार करत बसलं तर यातून एकाही प्रश्नाचं उत्तर सापडणार नाही. निर्मलाही रात्रभर विचार करायची येणार्याी दिवसाचा आपल्या भावी जीवनाचा. पण भावी आयुष्याचा मार्ग दाखविणारा कोणीतरी सापडावा.
आपल्या नशिबी हेच आहे असे म्हणून ती दिवस ढकलायची. माणसाचं कर्तृत्वा संपत तिथून नशीब नावाचं उंबराच फूल निर्माण होतं. ते फुल कोणालाही दिसत नाही.
अशा नशीबाला माणूस कवटाळून बसतो. ते नशीब कधीही माणसाला साथ देत नाही. आयुष्याचा कायापालट करत नाही.
नशीब म्हणून निर्मला कंटाळली. दररोजच्या जीवनाचा तीला किळस येऊ लागला. त्यात तिच्या आईची तब्बेत बिघडू लागली. तिला दमा झाला होता. खोकून खोकून बेजार व्हायची. पैसा नसल्यामुळे चांगले उपचार करता येत नव्हते. गरीबाजवळ नेहमी पैसा असावा. पण असं कधी होत नाही. गरीबाजवळ पैसा असेल तर त्याअला गरीब कसं म्हयणायचं.
निर्मला आईचा उपचार योग्य प्रकारे करु शकत नव्हती. अन तीची आई दिवसें दिवस खंगत चालली. एक दिवस तिची आई म्हबणाली, ‘‘पोरी निर्मला, माझं आता संपलय असं वाटू लागलय.’’
‘‘तसं म्हणू नकोस गं मी हाय तुझ्यासाठी. जीवाचं रान करीन. पण तुला काय बी होऊ देणार नाही. तू भिऊ नकोस मी पाठीशी हाय.’’
‘‘पोरी तू अशी उपरी, तुझं पोट भरताना नाकी नऊ येतयं, देवीला कधी विसरु नकोस.’’
‘‘पण! आई देवी सगळ्यांच कल्याण करते. मग आपलं का कल्याईण करीत नाही. बाकीची वर्षातून एकदा तिची पूजा करत्याोती. आठवड्यातून नाही तर महिन्यातून. आपण मात्र तिला रोज डोक्यावर घेऊन फिरतोय. ही मात्र आपणाला अशी गरीब का ठेवत्या?’’
‘‘पोरी खुळी हायसं, अगं तिनं बराबर कुणाला ठेवायचं तिथं ठेवलयां, तुला इथचं ठेऊन तिला दररोज तुझ्याकडून पुजा करून घ्या यची होती. म्हणून तुला तिला घेऊन फिरावं लागतं!’’
‘‘पण मीच का?’’
‘‘पोरी, कुंभार एकदाच मातीची सगळी गाडगी बनवितो. पण त्यातली सगळीच दुधाला, दह्याला जात नाहीत. एखाद माणसाच्या प्रेतासाठी जातं. त्यात त्यानं का वाईट वाटून घ्यायचं? अन् त्या कुंभाराला दोष तरी का द्यायचा? निर्मला आईला घट्ट मिठी मारुन रडू लागली. आई तिची आसवं पुसत अडखळत म्हणाली, ‘‘पोरी मला सौंदत्तीला घेऊन चल, डोंगराला जाऊन आईला डोळ भरुन बघायची इच्छा हाय, म्हलजी डोळ मिटायला बरं.’’
‘‘आये, तशी का म्हणतेस, माझं आयुष्य मी तुला देणार हाय. यंदाच आपण देवीला जायचं.’’
अन् निर्मला आईला घेऊन सौंदतीला गेली. आईचं दर्शन घेतलं. तिथला भंडारा कपाळाला लावला तिथली माती डोक्यास लावली. सगळ्या ओळखी पाळखीच्या माणसांच्या भेटी झाल्या.
मन भरुन बोलणं, फिरणं झालं. कधी नव्हे ती निर्मलाला आईच्या चेहर्याावर उत्साह दिसत होता. खोकल्याची उबळ कमी होती. सगळी माणसं भेटली. ती सर्वांना सांगत होती, माया निर्मलाकडं लक्ष ठेवा, एकटी पोरगी कुठबी भरकटल, तर तीला आधार दे.
सगळ्या पोरी, पोरं तिथं कानाकोपर्यारतून गोळा झाली होती. गात होती, नाचत होती. आईच्या नावानं उदो उदो करीत होती.
यात्रा संपली. सर्व आपआपल्या घरी गेली. निर्मलाच्या आईला अथणीला आणलं. तिच्या छोट्याश्या जुन्या घरात. तिला तिथं भुतकाळ आठवू लागला. भूतकाळात सगळा अंधार होता. कुणालाही न सांगता येण्यासारखा.
प्रत्येक भांड न भांड बघितलं, आंगण बघितलं, शेजार्या पाजार्यांाच्या भेटी घेतल्याक. जुन्या आठवणी बोलून दाखविल्याा, पोरीचं तोंड भरुन कौतुक केलं. प्रत्येतक वाक्यावत पोरीचा अभिमान दिसून यायचा. गावातल्या प्रत्येक देवळात दर्शन घेऊन आली. चेहर्यारवर समाधानच समाधान. माय लेकी झोपी गेल्या. पहाटेचे चार वाजले असतील. हालवून निर्मलाला जागं केलं. ‘‘ये उठ की, किती झोपतीस चल?’’
‘‘का? काय झालं?’’ निर्मला डोळ चोळत
‘‘अगं, उठून तरी बस.’’
आणि उजाडायला अजून अवकाश होता. निर्मला उठून बसली.
‘‘असं काय बघतेयस आये?’’ निर्मला आश्चर्याने म्हणाली.
‘‘काय न्हाय, आक्षी पुनवच्या चंद्रावानी हायस बघ. उगी एवढी हुतीस तवाच मांडीवर घेऊन निरखुन पाहीली तवापासून येळच मिळाला नाय.’’
निर्मलाच्या डोळ्यात पाणी आलं. ‘‘पोरी डोळयात पाणी आणायचं न्हाय, हे डोळे देवानं देखणी दुनिया बघायला दिलेत असं रडायला न्हाय.’’ आईन डोक्यावरन हात फिरविला, दिवा खाली ठेवला. तो वात्सल्याचा हात, ती मायेची ऊब, निर्मला आईकडं एकटक बघू लागली. आई अशी का वागते.
‘‘पोरी समद करावसं वाटतं, समद असावं वाटतं, पण सगळच या जन्मात पुरं होत नाय, त्यासाठी माणसाला दुसरा जन्म घ्यावा लागतो. त्यात बी पुरं नाय झालं तर तिसरा मिळतो. मला तुझ्यासाठी कधी गोड घास करता आला नाय. लहानपणी साबणानं अंघोळ घालता आली नाय. तुला कधी तुझा बाप कोण हे सांगता आलं नाय. पोरी मला माफ कर. तुझ्या आईला माफ कर. मी फक्त जन्म दिला. हिर्याीसारखी पोरगी मी कोळश्यासारखी केली. कधी दिवाळीला अत्तर नाय, केसात गजरा नाय, पोरी लहानपणी तू लय हट्टी होतीस. पण तुझा हट्ट मला कधी पुरवता आला नाय.’’
‘‘नाय आये, माझी काय बी तक्रार नाय. मला माहीत हाय, दुसर्या्च्या घरी अर्धा लाडू मिळाला तर त्यो पदरात बांधून माझ्यासाठी घेऊन येत होतीस. नवीन साडी कधी नेसली न्हाईस, गाठी मारुन लाज राखलीस. तू उपाशी राहून मला पोटभर खाऊ घातलसं. पुढच्या जन्मी तुच माझी आई हो. तुझी सेवा करायची हाय मला.’’
आई हासली, ‘‘पोरी माझ्या लाडक्या पोरी’’ म्हणून निर्मलाच्या गालाचा मुका घेतला. अन् खोकल्याची एक उबळ आली, अन् निर्मलाकडे पहातच आई तिच्या मांडीवर कोसळली. निर्मलानं हंबरडा फोडला. आई.....
दिवा विझला. बाहेर काळोख दाटला. हंबरडा ऐकून आयाबाया गडी माणसं धावून आले. निर्मलाची आई कधीच देवाघरी गेली होती.
आई ती आईच! या दोन शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष देवालाही लावता येत नाही. हजारो पानं लिहीणारा प्रतिभावंत कवी, लेखकाला या दोन शब्दाचा अर्थ सांगता येत नाही. आई गेली आणि निर्मला पूर्ण पोरकी झाली. ती सर्वांना भेटायचं टाळू लागली. जो तो आपल्या कामधंद्याला लागला. निर्मलाची दिवसातून एकच वेळच्या जेवणाची सोय होऊ लागली. ती उपाशी आहे की जेवली आहे हे बघायला तिला मायेचं कोण नव्हतं. फक्त रात्री आई तिच्या स्वूप्नात यायची.
‘‘पोरी भूक लागली का?’’ असं म्हणायची अन् पदरातून एक लाडू काढून द्यायची.
‘‘पोरी तू उपाशी असताना मी कशी जेवणार, तुझी आय हाय मी.’’
निर्मला ‘आई’ म्हणायची अन् दचकून जागी व्हायची. फक्त डोळ्यातून पाणी यायचं. पण डोळ्यापुढुन दिवस उगवेपर्यंत तिची आई जायची नाही. म्हणतात ना डोंगराआड गेलेला सुर्य दिसेल, पण माती आड गेलेली आई दिसत नाय.
एक दिवस तंगवा गावी आली आणि काही बायका तिच्या भोवती गोळा झाल्या. निर्मलाही गेली. बघते तर चारपाच तोळ सोनं अंगावर, साडी भरारी, केसाला थोडी स्टाईल मारलेली. तिन जरा चौकशी केली तर समजलं, ती मोठ्या शहरात असते, तिचा मोठा व्यवसाय हाय. पोरींना तिकडं कामालाही लावते. तिच्या मनात नकळत आलं, आपणही सांगलीला जावं, तिनं धाडस करुन विचारलं ‘‘मी येऊ का?’’
‘‘अंग तिथं येऊन तू काय करणार?’’
‘‘तु सांगशील ते काम करीन.’’
मग तर उद्याच जायची तयारी कर निर्मला व तंगवा मावशी सांगलीच्या बस स्टॉपवर उतरली. बस स्टँ ड समोरी हॉटेलात तंगवाने तिला मिसळ, शिरा खायला घातला. सायंकाळचे सहा वाजले. तशी तिला जाग आली. आपण कुठे आलोत. तर तंगवा मावशी म्हणाली राहायची असलीस तर रहा नायतर जा. दोन दोन दिवस उपाशी पोटी राहण्यापेक्षा हे बरं असं तिला वाटल. निर्मला पहात होती. तरण्याताट्या पोरी तोंडाला पावडर लावून ओठाला लाली लावून हसत हसत सर्व काही बिनधास्त स्विकारत होत्या. अनेक प्रकारची माणसं तिथं येत होती. सर्व काही मनात नसताना स्विकारल जात होतं. निर्मलाला काही सुचेना. शेवटी ती ही आपसुकच यात ओढली गेली. देवदासीची भोग दासी झाली. ‘‘वेश्या’’ नावाचा शिक्का तिच्यावर बसला, देवीचं नाव घेऊन जग डोक्यावर घेऊन पोट भरत होतं... पण इथं काय वेगळच दररोज देहाची विक्री, दररोज नविन गिराईक... छे! इथं माणूस म्हणाल तर... मन कधीच मरतं....
सायंकाळी जीवनाची सुरवात. सकाळी झोप. संध्याकाळी तोच मेकअप. तेच भिरभिरणारे डोळे. सगळं काही ऐकायचं आणि पचवायची शक्ती येते. पुन्हा पुन्हा तर त्याशिवाय जमतच नाही. निर्मलाही याला अपवाद नव्हती. तीही यात एकरुप झाली. कसलीही भेसळ न करता आपल्या धंद्यात प्रामाणिकपणाने राहतात. कुणास फसवत नाहीत. कुणास लुबाडत नाहीत. व्यवहारी जगात चालतं त्याकच्यापेक्षा तिथं कितीतरी चांगलं पहायला मिळतं.
आपल्या भावना वासनांची पुर्ती करतो, तो तिलाच नावे ठेवतो. ‘‘वेश्या’’ या शब्दाने तिला हिणवतो... पण ती नसती तर....
आपण पेपर मध्ये लिंग पिसाट माणसाने असे केले, तसे केले, अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तर कधी विनयभंग वर्तमान पत्रात वाचतो. त्याचे प्रमाण वाढले असते. पण निसर्ग नियमाचा विचार करता समाजाला थोडं तरी अबाधित राखण्याचा संतुलन ठेवण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत असतो.
निर्मला तिच्या जीवनाचा व जगण्याचा स्वतःलाच तिरस्कार वाटू लागला. वास्तव फार भयानक होतं... तितकंच हृदय पिळवटून टाकणारं...
निर्मलाला समाजान बरंच काही शिकवलं होतं. तिनं विचारांती एक ठोस निर्णय घेतला. या परंपरेच्या शृंखला तोडायच्या. देव मानायचा फक्त मानायचा पण ज्या रूढी, परंपरा व चालीरीती विचित्र आहेत व ज्या विज्ञान युगात मनाला पटणार नाहीत त्या स्वीकारायच्या नाहीत. देवे बद्दल श्रद्धा व अंधश्रध्दा नाही. मंदिरातील मूर्तीची पूजा करायची हात जोडायचे पण डोकीवर घेऊन कोणत्याच देवाला फिरवायचे नाही. फक्त भक्ती करायची. मंदिरातील मूर्ती हे साधन आहे साध्य नव्हे.
खरा परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयात न निसर्गाच्या प्रत्येक अणुरेणूत आहे. त्याला ओळखायचं. तीच खरी विश्व शक्ती. मग त्यांची नावे अनेक आहेत. कोण खंडोबा म्हणेल, कोण यल्लम्मा म्हणेल, कोणी बिरोबा, म्हसोबा तर कोणी अनेक नावांनी पुकारेल. नद्यांच पाणी जसं समुद्राला मिळत तसंच कोणत्याही देवाचं नांव घेतलं की, ते एकाच विश्व शक्तीला जात. कारण सृष्टीचा निर्माता कोणतरी आहेच. तो खरा देव एक आणि एकच.
तुकाराम महाराजांनी पण सागितलं ‘तुज आहे तुज पाशी, परी तू जागा चुकलाशी’ जिथे दारिद्र्य, अडाणीपणा जास्त त्या ठिकाणी देव - देव जास्त. पण कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही. हे कसं लोकांना कळत नाही?
निर्मला सातवी पर्यंत शिकली होती. अनेक पुस्तके तिने वाचली होती. शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे विचार तिला पटले अन् तिने निर्णय घेतला. उद्याला उगवणारा दिवस हा क्रांतीदिन असेल. उद्याचा सूर्य आपल्या सोनेरी किरणांनी माझं भविष्य बदलून टाकेल. जीवन हे एकदाचं मिळत अन् परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे.
या मिळालेल्या जिवनाच व आयुष्याचं सोनं करायचं. निर्मलाच्या डोळ्यासमोर तिच्या सारख्या सातवीतून शाळा सोडलेल्या निरागस मुली दिसू लागल्या. शाळेची पाटी दूर फेकून पायात बांधलेल्या घुंगरांचा आवाज कानावर आदळू लागला. निर्मल बेचैन झाली. विचारांचं थैमान तिच्या डोक्यात वादळा प्रमाणे वाहू लागलं. पहाटेचे चार वाजले तरी तिला झोप येईना. काहीतरी वेगळ करायचंच या निश्चयान ती वेडीपिसी झाली होती.
तितक्यात पहाटे कोंबड्याने बांग दिली. फटफटीत झालं होतं. अंधाराला कापत सूर्य प्रकाश धरणीवर येत होता. पाखरांचा किलबिलाट सुरु झाला होता. निर्मलान तिच्या परंपरेच्या बेड्या तोडल्या. तिने आपली बॅग भरली व ती झोपडीबाहेर पडली. रविराजाच्या सूर्य किरणात ती न्हावून निघाली. तिनं पाऊल पुढ टाकल प्रगतीचं.
तिनं ठरविलं, ‘माझ्या जिवनाच जसं वाटोळ झालं, मातेरं झालं तसं माझ्या सारख्या इतर मुलींचं होऊ देणार नाही. त्यांच्या पायात घुंगरू बांधू देणार नाही की, कोठीवर बसू देणार नाही. त्यांच्या गरिबीचा व असहाय्यतेचा फायदा या ढोंगी समाजाला उठवू देणार नाही.
मुलींना शिक्षण देणार, मोठ्ठ करणार अन् त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार. ही परंपरेची, अंधश्रद्धेची बेडी त्यांच्या पायातून काढणार त्यांना मुक्त करणार... मुक्त करणार...
निर्मला निघाली बाहेर पडली. ती सामाजिक परिवर्तनाची, बदलाची दिशा घेवूनच. तिने घरोघरी जाऊन, स्त्रीच्या शिक्षणाच महत्व सांगितलं. यात आपण कसे अडकलोय तेही सांगितलं. त्यांच्या आई- बापांना पटवून दिलं. त्यासाठी थोरा मोठ्यांचे दाखले दिले. शेकडो मुलींना तिचे विचार पटले व त्यातूनच निर्मलाने एक सामाजिक संस्था काढली व त्या संस्थेमध्ये शिक्षण, व्यवसाय शिक्षण, मूल्यशिक्षण, देशप्रेम इत्यादी शिकवू लागली. तिच्या संस्थेतील काही मुली इंजिनिअर झाल्या तर काही सैनिक झाल्या. काही पोलीस झाल्या तर काहींनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. आनंदाने त्या पोट भरू लागल्या. चांगल्या मार्गाने मिलेल्या अन्नाची चव वेगळीच असते.
निर्मलाने जुन्या रूढींना तिलांजली देऊन एका नवीन पर्वाची सुरुवात केली होती. अंधारातून प्रकाशाचा मार्ग सापडला होता. तिच्या सारख्या फसलेल्या व रूढी, परंपरेत अडकलेल्या निराधार अनाथ मुलींचा निर्मला आधार बनली होती.
सुख कशात आहे, आनंद कशात आहे याचं मर्म तिला कळलं होतं. आजही निर्मला काखेला पर्स अडकवून सकाळी बाहेर पडते ती दररोज एक नवा विचार घेऊन, एक नवी दिशा घेऊन. क्रांतीचं अन् परिवर्तनाचं बी रुजवण्याकरिता काठी टेकत टेकत अन् आपल्या डोळ्यावरचा चष्मा सावरत...

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.