श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकंसांतकाय नमः ॥
आजि दैवदशा धांवोनि सत्वरी ॥ पातली श्रीतयांच्या घरां ॥ जे भक्तकथा ऐकतां चतुरा ॥ अनुभव अंतरा आला कीं ॥१॥
जेवीं निजांगें शर्करा खातां देख ॥ गोडी लागे अधिकाधिक ॥ तेवीं भक्तकथा ऐकतां सुख ॥ अंतरीं विवेक ठसावें ॥२॥
कीं सुधारस सेवितां लवडसवडी ॥ सकळ व्याधी पळती तांतडी ॥ तेवीं भक्तकथेची लागतां गोडी ॥ अविद्यां धडपुडी बाधेना ॥३॥
उदंड कथा आहेत सकळ ॥ परी हें शांतिवृक्षाचें अमृतफळ ॥ सेवूं जाणती भक्त प्रेमळ ॥ विकल्पजाळ टाकूनि ॥४॥
भक्तकथा ऐकूं जे म्हणती ॥ ते कळिकाळासी वश न होती ॥ म्हणोनि सादर होऊनि श्रोतीं ॥ अवधान प्रीतीं मज द्यावें ॥५॥
मागिले अध्यायीं कथा सुरस ॥ चांगदेवासी जाहला उपदेश ॥ मग एकदां सकळ संत एकादशीस ॥ पंढरपुरास चालिले ॥६॥
तंव अंत्यजयातींत आगळा ॥ वैष्णवभक्त चोखामेळा ॥ तयासी प्रसन्न घनसांवळां ॥ अंतरीं कळवळा देखोनि ॥७॥
मग जन्मभूमि पंढरींत ॥ कुटुंबसह राहिला तेथ ॥ हृदयीं आठवोनि रुक्मिणीकांत ॥ नामस्मरण करीतसे ॥८॥
स्नान करूनि भीमातीरीं ॥ प्रदक्षिणा घाली सर्व पंढरीं ॥ मग येऊनियां महाद्वारीं ॥ लोटांगण घालीतसे ॥९॥
आंत जाऊन घ्यावें दर्शन ॥ हा अधिकार नाहीं त्याकारण ॥ म्हणोनि ध्यानीं आणोनि जगज्जीवन ॥ दुरूनि नमन करीतसे ॥१०॥
तंव कोणेएके अवसरीं ॥ बैसला होता महाद्वारीं ॥ तयासी देखोनि दुराचारी ॥ काय बोलती तें ऐका ॥११॥
विठोबासी तुझी असती प्रीती ॥ तरी राउळांत नेता तुजप्रती ॥ दृष्टीस न देखतां रुक्मिणीपती ॥ करिसी व्यर्थ भक्ति कासया ॥१२॥
विप्रांघरीं निपजलें पक्वान्न ॥ त्या अनसुटपात्रीं न बैसे श्वान ॥ तेवीं पांडुरंगभक्ती अधिकार जाण ॥ अंत्यजयाति नसे कीं ॥१३॥
कीं नृपवराचें भोगमंदिरीं ॥ भणंग प्रवेशेल कैशियापरी ॥ तेवीं चोखामेळ्यासी राउळांतरीं ॥ जातां नयेचि सर्वथा ॥१४॥
नातरी निर्दैवी फिरतां रानोरानीं ॥ तयासी कल्पतरु न दिसे नयनीं ॥ तेवीं चोखामेळ्यासी चक्रपाणी ॥ न दिसे नयनीं सर्वथा ॥१५॥
कीं अमृतकुंड पाहावया दृष्टीं ॥ आयुष्यहीन व्यर्थचि लाळ घोंटी ॥ तेवीं राउळीं असोनि जगजेठी ॥ तुज नव्हेचि भेटी सर्वथा ॥१६॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ तयासी केलें साष्टांग नमन ॥ म्हणे मायबापा मज एवढें भूषण ॥ व्यर्थ कासया पाहिजे ॥१७॥
उंच लक्ष गांवें वासरमणी ॥ दुरूनि सांभाळी जैसा कमळिणी ॥ तेवीं राउळीं असोनि चक्रपाणी ॥ माझा सांभाळ करीतसे ॥१८॥
कीं दोन लक्ष गावें निशापती ॥ परी त्याची चकोरावरी अत्यंत प्रीती ॥ तेवीं अनाथनाथ कृपामूर्ती ॥ माझें स्मरण करीतसे ॥१९॥
नातरी कांसवी आपुलिया पिलियांसी ॥ दुरूनि सांभाळ करी जैसी ॥ तेवीं आपुले दासांसी हृषीकेशी ॥ कृपादृष्टीं पाहातसे ॥२०॥
अखंड असतां सन्निध पाहीं ॥ जरी प्रीति नसली त्याचे ठायीं ॥ तरी निकट वास करूनि कांहीं ॥ सार्थक नाहीं सर्वथा ॥२१॥
ऐसें बोलोनि त्या अवसरा ॥ सत्वर गेला निजमंदिरा ॥ हृदयीं आठवोनि रुक्मिणीवरा ॥ भजन करी सप्रेम ॥२२॥
तंव रात्रीं येऊनि पंढरीनाथ ॥ चोखामेळ्यासी काय बोलत ॥ आज मी आपुलें राउळांत ॥ नेतों त्वरित तुजलागीं ॥२३॥
ऐसें बोलोनि रुक्मिणीपती ॥ तयासी सत्वर धरिलें हातीं ॥ अंतरगाभारां निजप्रीतीं ॥ घेऊनि गेला तेधवां ॥२४॥
आपुलें जीवींचें निजगुज ॥ चोख्यासी सांगे गरुडध्वज ॥ म्हणे तुजवांचोनि क्षणैक मज ॥ न कंठेचि सर्वथा ॥२५॥
नामयासवें करितां भोजन ॥ कीं आवडी सेवितां अमृतपान ॥ ते वेळीं तुझी आठवण ॥ माझिया मनांत होतसे ॥२६॥
ऐसें बोलतां हृषीकेशी ॥ चोखा लागला चरणांसी ॥ म्हणे तूं अनाथनाथ म्हणविसी ॥ लळे पाळिसी दासांचे ॥२७॥
ऐसा संवाद ते अवसरीं ॥ पूजारी ऐके निजोनि द्वारीं ॥ मग विस्मित होऊनि अंतरीं ॥ उठिला झडकरी तेधवां ॥२८॥
मग आणिकासी साक्ष बोलावूनी ॥ वृत्तांत सांगे तयालागोनि ॥ म्हणे चोख्याऐसा दुसरा कोणी ॥ चक्रपाणीसीं बोलतो ॥२९॥
साक्षात परब्रह्म वैकुंठवासी ॥ अंत्यज जाऊनि शिवला त्यासी ॥ द्वारासी कुलुपें आसोनि तैसीं ॥ गेला तो कैसा कळेना ॥३०॥
वस्त्रें भूषणें देवावर ॥ तयांसी शिवला अत्यंज नर ॥ बुडाला ब्राह्मण आचार ॥ कैसा विचार करावा ॥३१॥
जैसा पौर्णिमेचा निशापती ॥ अति सोज्वळ त्याची कांती ॥ मग राहु येऊनि सत्वरगती ॥ आलिंगन प्रीतीं देतसे ॥३२॥
नातरी अमावास्येचा वासरमणी ॥ सत्वर चालतां देखोनि गगनीं ॥ त्यासी अकस्मात केतु येऊनी ॥ कलंक लावी निजतेजा ॥३३॥
तेवीं षड्गुणैश्वर्य रुक्मिणीपती ॥ श्रुतिशास्त्रें जयासी वर्णिती ॥ त्यासी अंत्यज येऊनि रात्रीं ॥ भेटतो प्रीतीं निजप्रेमें ॥३४॥
ऐसिया उपाय कवण ॥ कैशा रीतीं निवारे विघ्न ॥ एक म्हणती बोलावून ॥ तयासी पुसावें सत्वर ॥३५॥
मग कुलूप काढोनि सत्वरगती ॥ चोख्यासी वृत्तांत अवघे पुसती ॥ म्हणती राउलीं आलासी कैशा रीतीं ॥ तें सांग निश्चितीं आम्हांसी ॥३६॥
ऐकोनि बोले चोखामेळा ॥ म्हणे मी तुमचा लेंकवळा ॥ मज हातीं धरूनि घनसांवळा ॥ आणी राउळा बळेंचि ॥३७॥
आतां अन्याय घालोनि पोटीं ॥ मजवरी करा कृपादृष्टी ॥ ऐसें म्हणूनि उठाउठी ॥ निघता जाहला तेधवां ॥३८॥
मग पूजारी तयासी वचन बोलत ॥ तुवां न राहावें पंढरींत ॥ येथें असता पंढरीनाथ ॥ आणितो राउळांत तुजलागीं ॥३९॥
म्हणोनि चार पाउलें दूरी ॥ राहावें चंद्रभागेचे पैलतीरीं ॥ नाहीं तरी शिक्षा झडकरी ॥ तुज निर्धारीं करूं आम्ही ॥४०॥
तुवां थोर केला अन्याय ॥ बाटवूनि टाकिला देवाधिदेव ॥ या दुरितेंकरूनि रौख ॥ भोगणें लागे तुजलागीं ॥४१॥
ऐसें बोलतां द्विजवर ॥ मग चोखा देतसें प्रत्युत्तर ॥ म्यां बाटविला रुक्मिणीवर ॥ हा मिथ्या विचार बोलतसां ॥४२॥
तरी अत्यंज आणि ब्राह्मण ॥ दोघीं गंगेंत केलें स्नान ॥ हें देखतां गंगेसी दूषण ॥ ठेवूं नये सर्वथा ॥४३॥
कीं चोखाळ वाटे जी क्षिती ॥ तिजवरी चालती सकळ याती ॥ तीस विटाळ जाहला कैशा रीतीं ॥ कवणे शास्त्रीं लिहिलें ॥४४॥
कीं दुर्जनासी स्पर्शतां पवन ॥ त्यास न लागे त्याचा अवगुण ॥ मग वायांचि विकल्प धरूनि मन ॥ बाजूस दूषण ठेवणें ॥४५॥
कां सौंदणीं आणि रांजणांत ॥ आकाश बिंबलें असेचि त्वरित ॥ तरी त्या दोहींत असोनि अलिप्त ॥ गुंतोनि निश्चित न राहे ॥४६॥
तेवीं देवाधिदेव रुक्मिणीपती ॥ त्यासी सारिख्या सकळ याती ॥ तयासी विटाळ कैशा रीतीं ॥ तुमचें चित्तीं भासतो ॥४७॥
अनंतब्रह्मांडें भरून जाणा ॥ अलिप्त असे वैकुंठराणा ॥ तरी वायांच विकल्प धरूनि मना ॥ होतसां दूषणा अधिकारी ॥४८॥
ऐसें ऐकतां दृष्टांतवचन ॥ क्रोधयुक्त बोलती ब्राह्मण ॥ सकळ यातींत नीच मलिन ॥ आम्हां ज्ञान सांगतसे ॥४९॥
शलभ आपुल्या शहाणपणेंकरून ॥ गरुडासी शिकवितो उड्डाण ॥ कीं अजापालक येऊन ॥ बृहस्पतीसी ज्ञान सांगे ॥५०॥
कीं सुवर्णापुढें बेगड सवेग ॥ दाखवी आपली झगमग ॥ कीं शेषापुढें इतर नाग ॥ मणिभूषण दाखविती ॥५१॥
कीं ऐरावतापुढें इतर वारण ॥ करून दाखविती स्थिर गमन ॥ कीं शंकरापुढें इतर गण ॥ तांडव करून दाखविती ॥५२॥
कीं वासरमणि देखोनि सहज ॥ त्यापुढें खद्योत मिरवी तेज ॥ कीं अगस्ति देखोनि सहज ॥ पयोब्धि गर्जना करीतसे ॥५३॥
तेवीं आम्हीं ब्राह्मण उंच वर्ण ॥ सर्व शास्त्रीं असतां निपुण ॥ तूं नीचजाति अंत्यज होऊन ॥ आम्हांसी ज्ञान सांगसी ॥५४॥
आतां भीमरथीचे पैलतीरीं ॥ जाऊन राहावें त्वां सत्वरीं ॥ उदयीक दृष्टीं देखिला जरी ॥ मग शिक्षा बरी पावसील ॥५५॥
शब्द ऐकोनि द्विजांचा ॥ चोखामेळा बोले वाचा ॥ म्हणे मायबाप सेवक मी तुमचा ॥ झाडवान साचा म्हणवितों ॥५६॥
बहुत दिवस सांभाळ केला ॥ आतां भवंडोनि देतां मजला ॥ ऐसें म्हणूनियां डोळां ॥ अश्रुपात लोटले ॥५७॥
म्हणे कृपावंत विठ्ठलमाये ॥ आजपासूनि अंतरले पाये ॥ माझें प्राक्तन बलवंत आहे ॥ करावें काय तयासी ॥५८॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ घरासी गेला अति सत्वरीं ॥ हरिरूप आठवूनि अंतरीं ॥ स्मरण करी निजप्रेमें ॥५९॥
कांतेसी सांगोनि वृत्तांत ॥ म्हणे आम्हांसी उबगला पंढरीनाथ ॥ आतां पैलतीरा जाऊनि त्वरित ॥ तेथेंच राहूं उभयतां ॥६०॥
मग सन्मुख लक्षूनि देउळा ॥ पैलतीरीं बांधिली दीपमाळा ॥ तेथें राहूनि चोखामेळा ॥ हृदयीं घननीळा चिंतितसे ॥६१॥
अद्यापि यात्रेस जाती कोणी ॥ ते दीपमाळा देखती नयनीं ॥ ते स्थळीं भक्तशिरोमणी ॥ उदास होऊनि राहिला ॥६२॥
ध्यानांत आणूनि रुक्मिणीपती ॥ भजन करी सप्रेमयुक्ती ॥ म्हणे देवें मोकलोनि मजप्रती ॥ टाकिली प्रीति दिसताहे ॥६३॥
तंव एके दिवशीं भक्त प्रेमळ ॥ भोजन करी चोखामेळ । तों अकस्मात येऊनि घननीळ ॥ बैसले तत्काळ सांगातें ॥६४॥
निंबाचिया वृक्षाखालीं पडली होती दाट साउली ॥ त्या छायेसी बैसोनि वनमाळी ॥ चोख्यासंगें जेविती ॥६५॥
तों कांहीं कार्यासी ते अवसरीं ॥ तेथें अकस्मात आला पुजारी ॥ उभा ठाकोनि निमिषभरी ॥ दुरून कौतुक पाहातसे ॥६६॥
तों दहीं उसळोनि अकस्मात ॥ वाढितां खालीं पडले त्वरित ॥ कांतेसी म्हणे अन्याय बहुत ॥ घडला तूंतें जाण पां ॥६७॥
सवें जेवितो रुक्मिणीवर ॥ तयाचा भरलासे पीतांबर ॥ ऐसें ऐकूनियां द्विजवर ॥ अंतरीं विस्मित जाहला ॥६८॥
मग कावळ्यासी म्हणे ते वेळीं ॥ निंबोळ्या चाखूनि टाकिसी खालीं ॥ येथें बैसले वनमाळी ॥ त्यांच्या अंगासी लागती ॥६९॥
तरी येथोनि उठोनि त्वरित ॥ आणिके शाखेवरी बैसें निश्चित ॥ ऐसें बोलतां वैष्णवभक्त ॥ पूजारी मनांत संतापला ॥७०॥
म्हणे आम्हांसी देखोनि दृष्टीं ॥ मिथ्या बोलतो अवाट गोष्टी ॥ अंत्यजासवें जगजेठी ॥ कासयासाठीं जेविला ॥७१॥
मग चोख्याजवळी विप्र त्वरित ॥ धांवूनि आला अकस्मात ॥ एक चफराक मारूनि मुखांत ॥ गेला त्वरित झडकरी ॥७२॥
स्नान करूनि भीमातीरीं ॥ ब्राह्मण गेला देउळाभीतरीं ॥ कौतुक देखोनि ते अवसरीं ॥ आश्चर्य करी मनांत ॥७३॥
विटेवरी उभा शारंगधर ॥ त्याचा दह्यानें भरला पीतांबर ॥ ऐसें देखोनि द्विजवर ॥ श्रीमुख सत्वर विलोकी ॥७४॥
तों देवाचा गाल सुजला जाण ॥ दोन्ही निडारले असती नयन ॥ ब्राह्मन मनीं विस्मित होऊन ॥ अंतरीं खूण पावला ॥७५॥
म्हणे म्यां गांजिलें चोख्यासी ॥ ते देवें साक्ष दाविली मजसी ॥ जेवीं दुर्जनें गांजितां बाळकासी ॥ तें दुःख मातेसी झोंबत ॥७६॥
तेवीं भक्तांचें करितां छळण ॥ दुःखी होतसे जगज्जीवन ॥ मग अभक्तांसी शिक्षा करून ॥ वाढवी महिमान दासांचें ॥७७॥
ऐसा विवेक करूनि अंतरीं ॥ पूजारी पातला भीमातीरीं ॥ चोख्यासी म्हणे ते अवसरीं ॥ राउळांतरीं चाल आतां ॥७८॥
नेणतां भक्तींचें महिमान ॥ म्यां व्यर्थचि केलें तुझें छळण ॥ जेवीं अमूल्य हिर्यासी मारूनि घण ॥ आणिला शीन आपणासी ॥७९॥
तुज मीं शिक्षा केली येथ ॥ तों राउळीं शिणले पंढरीनाथ ॥ गाल सुजला देखोनि मनांत ॥ भयभीत मी जाहलों ॥८०॥
तरी आतां निजभक्तराया ॥ सत्वर चलावें तया ठाया ॥ कांहीं उपकार करूनियां ॥ पंढरीराया तोषवावें ॥८१॥
मग चोख्यासी धरूनियां हातीं ॥ पूजारी आला राउळाप्रती ॥ दृष्टीं देखतां रुमिणीपती ॥ संतोष चित्तीं जाहला ॥८२॥
देवासी देतां आलिंगन ॥ चित्तासी वाटलें समाधान ॥ सुजलें होतें हरीचें वदन ॥ गेलें ओहटून तत्काळ ॥८३॥
निजभक्ताच्या वियोगदुःखें ॥ शिणले होते वैकुंठनाथ ॥ भेट होतांचि तात्कालिक ॥ अपार सुख पावले ॥८४॥
तैंपासोनि चोखामेळा ॥ सदा राउळीं येऊं लागला ॥ जेवीं गंगेनें अंगिकारिला ॥ तो पवित्र नाला जाहला कीं ॥८५॥
संत साधु वैष्णवजन ॥ आनंदें निर्भर जाहलें मन ॥ म्हणती निजभक्तांचा अभिमान ॥ जगज्जीवनें धरियेला ॥८६॥
आणिक ऐका चरित्र एक ॥ रुक्मिणीस म्हणती वैकुंठनायक ॥ आजि बहुत आला आम्हांसी ठणक ॥ रगडीं क्षण मजलागीं ॥८७॥
ऐसें बोलतां चक्रपाणी ॥ हांसूनि उत्तर देत रुक्मिणी ॥ म्हणे कवण कार्य करूनी ॥ आलेती सदनीं लवलाहें ॥८८॥
सांवत्याचा खुरपोनि आलेती मळा ॥ म्हणोनि शिणलेती भक्तवत्सला ॥ कीं कबीराचे मागीं विणिला शेला ॥ सप्रेम कळवला देखूनि ॥८९॥
कीं नामयाचें शाकारिलें घर ॥ नातरी लहुळासी जाऊनि आलेति सत्वर ॥ कीं ज्ञानदेव बैसले ज्या भिंतीवर ॥ ते ओढितां साचार शिणलेती ॥९०॥
किंवा चोख्याचीं ढोरें ओढिलीं काय ॥ तेणेंचि शिणले हातपाय ॥ कीं जोग्याचा धांवण्या लवलाह्य ॥ तांतडी करून आलेती ॥९१॥
ऐकूनि रुक्मिणींचें वचन ॥ काय बोलती जगज्जीवन ॥ आजि प्रातःकाळापासून ॥ सरिलें दळण जनींचें ॥९२॥
नामयाचें घरीं बहुत ॥ पाहुणे आले साधुसंत ॥ म्हणोनि आम्हीं जाऊन त्वरित ॥ साधिला कार्यार्थ लवलाहें ॥९३॥
घरीं कामाची आडाडी ॥ जनीस झाली अति तांतडी ॥ मग घागर घेऊनि लगडसवडीं ॥ उदक देव्हडी वाहिलें ॥९४॥
झाडाझाड करितां दासी जनी ॥ आम्हीं टाकिला केर भरूनी ॥ चारी हातें धुणें करूनी ॥ साळी कांडोनि दिधल्या ॥९५॥
ऐसें बोलतां वनमाळी ॥ विस्मित जाहली भीमकबाळी ॥ मस्तक ठेवूनियां चरणकमळीं ॥ श्रीमुख न्याहाळी प्रीतीनें ॥९६॥
अरळसुमनांचे शेजेवरे ॥ पर्यंकीं पहुडले श्रीहरी ॥ रुक्मिणी बैसोनि शेजारीं ॥ चरण चुरी स्वहस्तें ॥९७॥
आणिक ऐका नवलपरी ॥ कोणे एके अवसरीं ॥ नामदेव गरुडपारीं ॥ कीर्तनीं उभा राहिला ॥९८॥
मागें म्हणावया उभा नाहीं कोणी ॥ मग सत्वर पावले चक्रपाणी ॥ स्वहस्तें टाळ घेऊनी ॥ वाजवीत उभे राहिले ॥९९॥
वैष्णव भक्त देखोनि नयनीं ॥ आश्चर्य करिती अंतःकरणीं ॥ इंद्रादिक सुरवर येऊनी ॥ पुष्पवृष्टि करिताती ॥१००॥
रूप धरूनि श्रीपती ॥ कीर्तनरंगीं नृत्य करिती ॥ तो पितांबर फिटोनि अवचितीं ॥ पडला क्षितीं तेधवां ॥१॥
सप्रेम भुलले जगज्जीवन ॥ किंचित नाठवे देहभान ॥ तटस्थ जाहले वैष्णवजन ॥ कोणी वचन न बोलती ॥२॥
मग ज्ञानदेवें धरूनि कर ॥ उभा केला शारंगधर ॥ देवासी हांसोनि बोले उत्तर ॥ तें परिसा चतुर भाविक हो ॥३॥
तुम्ही सर्वज्ञ म्हणवितां चतुर ॥ आणि कीर्तनीं फिटला पीतांबर ॥ आतां सावध होऊनि सत्वर ॥ नेसा अंबर देवराया ॥४॥
ऐसें वचन ऐकून ॥ काय बोलिला जगज्जीवन ॥ माझे ठायीं मानापमान ॥ नाहींच जाण सर्वथा ॥५॥
सांडोनि लज्जा मीतूंपण ॥ सांडोनि लौकि देहभान ॥ सांडोनि देवपणाचा अभिमान ॥ कीर्तनरंगीं नाचतसें ॥६॥
नामयाचें प्रेम जैशिया रीतीं ॥ तैसाचि मी होय श्रीपती ॥ जेवीं दर्पणीं मुख जैसें पाहती ॥ तैसेच रीतीं दाखवितसें ॥७॥
कां ऋतुत्रय येतांचि देख ॥ आकाश दिसे तयासारिख ॥ तैशाच रीतीं मी वैकुंठनायक ॥ भक्तांसारिखा होतसें ॥८॥
ऐसा संवाद करितां सत्वर ॥ तों अकस्मात पातला भक्त कबीर ॥ मग उभे ठाकूनि वैष्णववीर ॥ आलिंगन दिधलें तयासी ॥९॥
वाराणसींत कबीरसंत ॥ पंढरपुरांत नामाभक्त ॥ यांची देवास अत्यंत प्रीत ॥ शुद्ध भावार्थ देखोनि ॥११०॥
धन्य पंढरी वैकुंठनगर ॥ जेथें नामयाचा कीर्तनगजर ॥ जीवन्मुक्त अवघे नारीनर ॥ असती साचार निजप्रेमें ॥११॥
गरुडटके निशाण भेरी ॥ वीणे वाजती मंजुळस्वरीं ॥ टाळिया पिटोनियां गजरीं ॥ स्वानंदमेळीं डुल्लती ॥१२॥
मग पंचप्राण उजळोनि ज्योती ॥ रुक्मिणी घेऊनि आली आरती ॥ नामयानें ओंवाळूनि श्रीपती ॥ दंडवत प्रीतीं घातलें ॥१३॥
निजभक्तांसी बोले शारंगधर ॥ आज कीर्तनरंग आला फार ॥ वचन ऐकोनि ज्ञानेश्वर ॥ काय उत्तर देतसे ॥१४॥
टाळ घेऊनि पांडुरंगें ॥ उभे ठाकले नामयामागें ॥ म्हणोनि वोळंगले सकळ रंगें ॥ प्रेम अंतरंगें देखोनि ॥१५॥
भास्करें दीपिका धरिली पाहें ॥ तेथें प्रकाशासी उणें काये ॥ कीं हिमकर विंजणा वारितां पाहें ॥ उष्ण उबारा कोठोनि ॥१६॥
समुद्र निजांगें वाहत जीवन ॥ मग रांजणीं उदक न राहे उण ॥ कीं पर्जन्यें घालितां संमार्जन ॥ कोरडें स्थळ न राहे ॥१७॥
लक्ष्मी स्वयंपाक करी जेथ ॥ सकळ रुचि ओळंगती तेथ ॥ कामधेनु स्वयें मंथन करीत ॥ तरी पुरे नवनीत त्रिभुवनीं ॥१८॥
तेवीं निजांगें रुक्मिणीकांत ॥ नामयामागें गाऊं लागत ॥ मग रंग यावया कायसी मात ॥ आश्चर्य चित्तांत करीतसां ॥१९॥
ज्ञानदेवाचें वचन ऐकोन ॥ हांसों लागले जगज्जीवन ॥ म्हणे आमुचे जीवींची निजखूण ॥ तुम्हांकारण कळतसे ॥१२०॥
मग सकळां वांटोनि खिरापती ॥ राउळीं प्रवेशले रुक्मिणीपती ॥ कबीरभक्तें येऊनि एकांतीं ॥ लोटांगण प्रीतीं घातलें ॥२१॥
आज्ञा मागोनि रुक्मिणीवरा ॥ कबीर चालिला रामेश्वरा ॥ ध्यानीं आणोनि श्रीरघुवीरा ॥ मार्ग सत्वरा क्रमीतसे ॥२२॥
तंव वाटेसी देखिलें एक नगर ॥ तेथें राहिला वैष्णववीर ॥ रात्रीं मांडिला कीर्तनगजर ॥ आनंदें निर्भंय होऊनि ॥२३॥
श्रवणा आले बहुत जन ॥ ऐकोनि सकळ जाहले तल्लीन ॥ त्यांत जीवा आणि तत्वा दोघे ब्राह्मण ॥ परम सज्ञान असती कीं ॥२४॥
म्हणती धन्य कबीर वैष्णव दास ॥ सिद्धांतज्ञानी चतुर विशेष ॥ तरी सद्भावें शरण जाऊनि तयास ॥ घेऊं उपदेश उभयतां ॥२५॥
मग जीवा तत्वा दोघे जण ॥ कबीरापासीं आले जाण ॥ सद्भावें घालोनि लोटांगण ॥ म्हणती आम्हांसी पावन करावें ॥२६॥
शुद्धभाव देखोनि अंतर ॥ कृपा केली तयांवर ॥ मस्तकीं ठेऊनियां कर ॥ अनुग्रह सत्वर दीधला ॥२७॥
मग रामेश्वरादि दक्षिणातीर्थ ॥ सकळ पाहूनि कबीर भक्त ॥ वाराणसीस गेला त्वरित ॥ अनुताप युक्त तेधवां ॥२८॥
तों इकडे जीवा तत्वा दोघे जण ॥ उभय बंधु असती जाण ॥ तयांसी निंदिती सकळ ब्राह्मण ॥ न घेती दर्शन सर्वथा ॥२९॥
वाळींत घालोनि तयांप्रती ॥ एकमेकांसी काय बोलती ॥ यांसी सोयरीक जे करिती ॥ ते अविंधपंक्ती बैसती ॥१३०॥
साक्षात् कबीर यवन ज्ञानी ॥ त्याचा अनुग्रह होतांक्षणीं ॥ ब्रह्मकर्मासी बोल लावूनी ॥ सिद्धांतज्ञानी विनटले ॥३१॥
ऐसें बोलती सकळ पिशुन ॥ परी ते नायकती तयांचें वचन ॥ म्हणती जातीसी काय कारण ॥ सद्गुरुचरण उपासितां ॥३२॥
तंव एकाचा पुत्र जाहला थोर ॥ एकाची कन्या उपवर ॥ म्हणोनि जाहले चिंतातुर ॥ चित्तीं विचार आठवेना ॥३३॥
कन्येसी वर न मिळे जाणूनी ॥ वधू न मिळेचि पुत्रालागूनी ॥ मग वाराणसीस जाऊनी ॥ कबीरापासीं सांगितलें ॥३४॥
अंतरसाक्ष कमालतात ॥ न सांगतांच कळला वृत्तांत ॥ म्हणे आमुचा उपदेश त्वरित ॥ घातलें वाळीत म्हणोनि ॥३५॥
मग जीवातत्वांसी कबीर भक्त ॥ म्हणे माझें वचन ऐका त्वरित ॥ तुम्हीं उभयतां आपुल्यांत ॥ शरीरसंबंध करावा ॥३६॥
सांडोनि निजकर्माचें भय ॥ सोयरीक करा निःसंशय ॥ ऐसें म्हणतां सद्गुरुराय ॥ अवश्य म्हणती ब्राह्मण ॥३७॥
मग कबीर म्हणे तयांलागूनी ॥ जरी विश्वास धराल माझें वचनीं ॥ तरी तत्काळ अरिष्ट निरसोनी ॥ सायुज्यसदनीं पावाल ॥३८॥
मग वंदोनि सद्गुरुचरण ॥ सत्वर निघाले ब्राह्मण ॥ आपुल्या स्वदेशास येऊन ॥ धरिलें लग्न तेधवां ॥३९॥
लग्नतिथी करूनि नेमस्त ॥ साहित्यासी लागले त्वरित ॥ वृत्तांत ऐकोनि नगरांत ॥ आश्चर्य वाटलें सकळांसी ॥१४०॥
आपुलें मुखें मंत्र म्हणून ॥ केलें पुत्राचें मौंजीबंधन ॥ उदयीक दोघांचें लावावें लग्न ॥ निश्चय मनीं हा केला ॥४१॥
मग सकळ मिळून ब्राह्मण ॥ तयांसी पुसती वर्तमान ॥ तुम्हांसी सोयरा मिळाला कोण ॥ उदयीक लग्न कैसें धरिलें ॥४२॥
ऐसें बोलतां द्विजवर ॥ ते काय देती प्रत्युत्तर ॥ आमचें गृहीं वधूवर ॥ आहेती साचार उभयतां ॥४३॥
पशुपक्षी जया रीतीं ॥ तैसीच असे आमुची याती ॥ ऐसी ऐकोनि वचनोक्ती ॥ आश्चर्य करिती धरामर ॥४४॥
म्हणती यांसी वाळितां साचार ॥ तरी आतांच होईल वर्णसंकर ॥ निमित्त येईल आपणावर ॥ क्षोभेल ईश्वरे निर्धारें ॥४५॥
सद्गुरुचरणीं विश्वास धरून ॥ यांनीं टाकिलें कर्मठपण ॥ आम्हांसी निर्णय कळला पूर्ण ॥ पाहिलें कसून मन यांचें ॥४६॥
मग जीवातत्वांस बोलावून ॥ तयांसी म्हणती सकळ ब्राह्मण ॥ आम्ही सोयरीक तुम्हांलागून ॥ स्वइच्छेनें देतसों ॥४७॥
तंव कन्येसी वर नेमून ॥ पुत्रासी वधू विचारून ॥ सकळ ब्राह्मणीं साहित्य करून ॥ केली लग्नें तयांचीं ॥४८॥
मग उभयतां जाऊन वाराणसी ॥ वृत्तांत सांगितला कबीरासी ॥ वचन ऐकोनि निजमानसीं ॥ सद्गुरुनाथ संतोषले ॥४९॥
पुढिले अध्यायीं कथा गहन ॥ पद्मनाभ चरित्र अति पावन ॥ महीपति म्हणे सभाग्य सज्ञान ॥ देवोत अवधान निजप्रीतीं ॥१५०॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ त्रयोविंशाध्याय रसाळ हा ॥१५१॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥२३॥ ॥ ओंव्या ॥१५१॥ ॥
भक्तविजय त्रयोविंशोध्याय समाप्त

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.