भारतात अमेरिकेपेक्षा खूप कमी प्रमाणात डिव्होर्स होतात असे का बरे असावे? ह्या गोष्टीचा कधी विचार केलाय का? उत्तर अगदी सोपं आहे, अमेरिकेतील लोकं फार जास्त प्रेमळ आहेत.. :) असे आश्चर्याने काय वाचताय? अहो खरंच ….!
म्हणजे असं पहा, जसे आपण जन्माला येतो, तेंव्हा आपले आयुष्यात आपल्या श्वासाचा किती कोटा आहे हे आधीच ठरलेले असते, तसेच आपल्या प्रेमाचा कोटा पण ठरलेला असतो. आता तो कोटा किती वर्षात पुर्ण करायचा हे आपल्यावर अवलंबुन असते. अमेरिकेत पहा बरं, लोकं सारखे प्रेम करत असतात, सकाळ,संध्याकाळ, उठता, बसता, काम करतांना केंव्हाही पहा सारखे प्रेम करत असतात. नवरा बायको तर लग्न होण्याच्या पूर्वीपासूनच अगदी शाळेत असतांना पासूनच प्रेम करणे सुरु करतात. आता इतके प्रेम केल्यावर त्यांचा प्रेमाचा कोटा एक दोन वर्षा संपणार नाही तर काय .. मग घेतात ना डिव्होर्स .
आपल्या कडे पहा, नेमकं याच्या उलट असतं नवरा बायको चे नाते हे एकमेकांची उणी दुणी काढण्यासाठी, आणि एकमेकांच्या नातेवाईकांची निंदानालस्ती करण्यासाठी असते की काय अशी शंका काही लोकांकडे पाहून येते.. बरं ते असो, पण थोडे निरीक्षण केलेल की लक्षात येईल, आपल्याकडे विवाहित स्त्री पुरुषांचे आयुष्य पहाल तर लक्षात येईल की, दिवस उजाडला की की ह्यांचे वादविवाद सुरु होतात, हळू हळू हे वाद विवाद भांडणा वर कधी पोहोचतात हे त्यांना पण समजत नाही, पण रात्र झाली की मात्र एकदम एकमेकाच्या बद्दलचे प्रेम उतु जायला लागते. सकाळची भांडणं आणि “रात्रीचे प्रेम “ह्यांची गोळाबेरीज शेवटी शुन्य होते!!!! अहो मग कोटा कसा काय पुर्ण होईल?
म्हणजे पहा, की जर तुम्हाला पुढच्या जन्मी दुसरी बायको हवी असेल ना, तर या जन्मी तरी प्रेमाचा कोटा पुर्ण करा. बायकोवर , मनमुराद, शक्य होईल तितके जास्त, शक्य होईल तेंव्हा प्रेम करा. आता हे सगळं कसे करायचे माहिती नसेल तर इंग्रजी सिनेमे पहा, त्यात समजेल, एखादा हिरो कसे फायटिंग सुरु असते, मधेच हिरोइन येते, बंदूक बाजूला, आर के ची पोझ घेऊन प्रेम सुरु – किंवा ती किचन मधे स्वयंपाक करत असते, तेवढ्यात हिरो येतो आणि झाले सुरु, स्वयंपाक राहीलाच बाजूला- जाउ द्या इथे जास्त लिहण्य़ा पेक्षा नॉटी अमेरिका, ट्युब८ पहा म्हणजे समजेल कसे असते ते.हे असे प्रेम कराल, तरच तुमचा कोटा पुर्ण होईल आणि पुढल्या जन्मी दुसरी बायको मिळेल!
आपल्या हिंदू धर्मात स्त्रियांसाठी असे १०-१२ तरी व्रत वैकल्य दिलेले आहेत ,की जे केल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते. आता मी थोडे जास्त पॉझिटीव्ह लिहिले आहे हे….. याचाच दुसरा अर्थ हा की बायकोने व्रत मोडले की नवरा श्री राम म्हणणार!! चाळणीतून चंद्र पहायचे करवा चौथ चे व्रत तर खास या साठीच आहे. बायको दिवस भर उपवास करते नवऱ्याचे आयुष्य वाढावे म्हणून. पण……. पण एखादी दुसरी मात्र थोडी जास्तच हुषार असते, आणि ह्या व्रताचा वेगळाच उपयोग करून घेते. दिवसभर उपवास करते आणि संध्याकाळी मात्र ” अहो, मला नेकलेस हवाय, आत्ताच्या आत्ता आणून द्या , तुम्ही नाही म्हणालात, की लगेच घरातून ब्रेडचा तुकडा घेऊन येते, आणि म्हणते, आता देता की नाही आणून? नाही तर तोडते उपवास!! तो उपवास तोडला आणि आपण मेलो तर??? तुमची नाही म्हणायची काय हिम्मत आहे? निघता बाजारात तुम्ही! अहो आयुष्याचा प्रश्न आहे शेवटी.
वटसावित्री उपवास मात्र अगदी न विसरता करतात या स्त्रिया. अहो कधी तरी तर उपवास मोडायची धमकी द्या ना? इथे ती वर दिलेली ट्रिक चालत नाही. तर तुम्हीच सारखे, ” अगं, कशाला उपवास करतेस? जाऊ दे ना, आज किनई मस्त पैकी तुझ्या आवडीच्या त्या हॉटेल मधे जाऊ या आपण म्हणता, पण ती मात्र अगदी साता जन्माचे वैर असल्याप्रमाणे अजिबात तयार होत नाही. पुरुषांनो तुम्हाला हा एकच चान्स असतो बरं का, तेंव्हा या दिवशी प्रयत्न करत रहा तिचा उपवास मोडण्याचे, येईल कदाचित यश!
तसेही आपल्या धर्मात सगळे काही देणाऱ्या देवता स्त्री याच आहे, पैसा हवा- लक्ष्मी कडे जा, विद्या हवी- सरस्वती कडे जा. सगळं काही अगदी पूर्वापार चालत आलंय. विष्णू क्षीरसागरात कुठे तरी बसलाय, जिथे पिण्याचे पाणी जरी लागले, तरी हजारो किमी प्रवास करावा लागेल बिचाऱ्याला. शंकर तर विचारूच नका – त्या हिमालयावर त्याला नेऊन बसवलंय. एवढ्या थंडी मधे पण अंगावर कपडा म्हणाल तर एक चामड्याचा तुकडा,अंगाला एखादं क्रिम वगैरे थंडीचे लावायला द्यायचे तर दिले भस्म चोपडून- आणि हा पण त्रास कमी वाटला म्हणून डोक्यावरून गंगा वहायला लावली- हे सगळं बिचाऱ्यानं मान्य केले आणि प्यायला मागितले तर , दिले विष–आता तुम्हीच सांगा तो तांडव करेल नाही तर काय? असो.. दोन पिडीत पती विष्णू आणि शंकर यांनी एकमेकांना भेटून आपापलं दुःख हलके करायचे ठरवले तरी पण ते शक्य नाही, कारण एक हिमालयात, तर दुसरा समुद्रात!
बरेचदा वाटते की हे इतके व्रत वैकल्य स्त्रियांसाठी आहे , किमान एक तरी पुरुषांसाठी असायला हवे होते. स्त्री पुरुष बरोबरीचा जमाना आहे हा, तेंव्हा पुरुषांना पण इक्वल चान्स हवाच की राव!
संजीव देशमूख ने परवा दोन पेग चढवल्यावर जी बडबड केली ती इथे लिहून काढली. आता तुम्हाला समजलं ना की मित्रांबरोबर बसून बार मधे ढोसण्यात का मजा येते ते?? . असो तर मंडळी, या पोस्ट साठी संजीव चे आभार..:) पोस्ट तुझीच रे, फक्त शब्दांकन माझे :)