एकदा एका मेंढ्यांच्या कळपातून एक कोकरू मागे राहिले होते. ते पाहून एक लांडगा त्याच्या पाठीमागे लागला. याच्या हातून आपण सुटत नाही असे लक्षात येताच कोकरू लांडग्याला हसत म्हणाले, 'अरे, तू मला ठार मारणार हे मला माहितच आहे पण निदान आनंदानं तरी मरावं असं मला वाटतं. तेव्हा तू जर मुरली मला वाजवून दाखवलीस तर मला आनंदाने मरण येईल.' ते ऐकून लांडग्याला फार आनंद झाला. त्याने आपली मुरली वाजविण्यास प्रारंभ केला. मुरलीच्या सुरावर कोकरू नाचू लागले. मुरलीचा आवाज ऐकताच जवळच असलेले कुत्रे धावत आले. त्याला पाहताच लांडगा घाबरून पळू लागला. पळता पळता तो मनाशीच म्हणाला, 'आपला धंदा सोडून भलत्याच धंद्यात पडल्याने असं झालं.' 'माझा खाटकाचा धंदा सोडून मी वाजंत्र्याचं काम करीत बसलो हा माझा केवढा मूर्खपणा !'
तात्पर्य
- नादी मनुष्याला, चतुर लोक सहज फसवू शकतात. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.