राघू -  नको, तुमची मदत नको. तुमच्या वडिलांनी हजारों कुळांना बुडवलं !

नारायण -  पण मी तसा नाहीं, मला तुझ्या भाऊ समज !

राघू -  तुमचे वडील कोण आहेत हें मी जाणतो !

पांडू -  राघू, असं बोलूं नये. नीज, गप्प पडून रहा; त्यांनी आपल्याला आयत्या वेळी पैसे दिले, गरज भागली; आणि कांही असलं तरी मुलाला बोलून काय उपयोग ?

नारायण - पांडया, माझ्या वडिलांची सर्वत्र होणारी बदनामी माझ्या ह्रदयाचं पाणी करते हो. माझे ते बाबा आहेत. पण त्याला मी काय करूं ? पांडया, राघूला औषध काय दिलं होतं ?

पांडू -  देवीचा अंगारा हेंच आमचं औषध !

नारायण -  पांडू, मी दुपारी डॉक्टरला घेऊन येईन ! त्याला तहान लागली तर या बाटलींतील पाणी द्या. मी ही दुसरीं बाटली आणली आहे, त्यांतील थोडं पाणी एका भांडयात ओतून व त्यांत वाटीभर दुसरं पाणी घालून त्याची पट्टी त्याच्या कपाळावर ठेवा. थांबा, नाहींतर मीच पट्टी करून कपाळावर ठेवतों. (तसें करतो.) जाऊं मी ?

पांडू - तुमचे किती उपकार !

नारायण - उपकार वगैरे कांहीं नाहीं; हा माझा आनंद आहे. जातों अं ! (जातो, पडदा.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel