प्रवेश चवथा
(पांडवाची झोंपडी, राघू पडला आहे. )
पांडबा- राघू, बोलत का नाहींस ? नारायणराव डॉक्टर घेऊन येणार होते ! पण - (डॉक्टर व नारायणराव प्रवेश करतात.)
डॉक्टर - हा पहा मी आलों आहें.
पांडबा - कोण ? (पाहून) या, बसा. पहा पोरगा कसा कोमेजल्या फुलावाणी झालाय् तो !
डॉक्टर - मी पाहतों अं ! गडबड नको करूं (तपासतो.) नारायणा टायफॉईट आहे. पांडवा, फार जपलं पाहिजे पाणी तापवून गार करून द्या. ताक, मोसंब्याचा रस पाजा; अंथरूणावरून उठूं देऊं नका; शौचाला बेडपॅन पाठवून देतों !
पांडबा - डॉक्टर, आम्हां गरिबांना हें कसं साधणार ? तुमचं येडपन् आम्हास कसं जुळेल ?
नारायण - पांडबा, मी आहें ना ! सारी मदत करीन बरं ! मी तुमच्या कडेच राहीन; कांहीं काळजी करू नका.
पांडबा - बरा होईल का हा पोरगा, डॉक्टर ?
डॉक्टर - होईल बरा ! जपून मात्र वागलं पाहिजे. पथ्यापाण्याला जपलं पाहिजे. तुम्ही भातभाकर मायेनं खायला द्याल, तर मरण मात्र जवळ येईल. मी सांगेन तसं वागा. नारासणा, चल औषध देतों. घाबरूं नका अं, पांडबा !
राघू - बाबा, पाणी ?
नारायण - सोडा द्या. पांडवा, आम्ही जातों.
डॉक्टर - बरा होईल बरं, पांडया, तुमचा मुलगा.
पांडबा - देव तुमच्या तोंडांत साखर पाडों. ( जातात, पडदा.)