'तुझं माझ्यावर प्रेम नाही. मी तुला इतके पैसे देतो. कधी कधी घोडयाच्या गाडीतून फिरवतो तरी तुझं प्रेम नाही.  का बरं असं? माझ्या मनाला काय वाटत असेल? तुझा त्याग करावा असं मनात येतं; परंतु तो कृतघ्नपणा होईल म्हणून भितो.'

'तुमचंही माझ्यावर कुठं आहे प्रेम? मलाच का एकटीला गाडीतून फिरवता? दुसर्‍या कुणी अवदसा नाही बसल्या तुमच्या गाडीत?'

'आपल्याच जातीच्या लोकांना शिव्या देणं वाईट.'

'आमची जात म्हणजे काय वाईट?'

'मग वेश्या होणं का चांगलं?'

'चांगलं नसेल तर लाळ घोटीत त्यांच्याकडे का जाता?'

'क्षणभर करमणूक.'

'आम्ही काय करमणुकीपुरत्या?'

'अग, थटटा केली. अशी रागावू नकोस. आज तरी इथं तुला एकटीलाच आणलं की नाही? खरं प्रेम तुझ्यावरच.'

'अगदी गळयाशपथ?'

'होय, शपथ.'

'खरंच, तुमच्याबरोबर बोलण्यात मला मजा वाटते. वेळ कसा पटकन जातो. तुम्ही माझ्याकडे आला नाहीत म्हणजे मी अधीर होते. हसता काय? खोटं नाही सांगत.'

'अगदी गळयाशपथ?'

'हो गळयाशपथ.'

असा दुसर्‍या जोडप्याचा संवाद चालला होता आणि तिसरे? तिसर्‍याचाही थोडा प्रकार पाहू या. बोलण्यावरून माणसाची परीक्षा होते. बोलण्याच्या स्वरावरून परीक्षा होते. त्या वेळच्या मुद्रेवरून परीक्षा होते.

'मला तुम्ही मोत्यांचा हार कधी देणार? देईन देईन म्हणता नि काही नाही. फसवी तुमची पुरुषांची जात!'

'आणि तुमची मोठी प्रामाणिक वाटतं? स्त्रियाच पुरुषांनाही जन्म देतात. स्त्रियाच फसव्या असतील म्हणून पुरुष फसवे होतात. स्त्रियांच्या ओठांवर साखर असते; पोटात विष असतं. बोलणं, हसणं गोड; परंतु मनांत डोकावून पाहिलं तर ? रामराम ! सारी घाण.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel