ज्यूलस टॅव्हर्निअर म्हणून अमेरिकेत एक मोठा चित्रकार होऊन गेला. एकदा एका लखपती व्यापा-याने त्याला आपल्या बंगल्याशेजारच्या बागेत बसून समोर देखावा दिसेल त्याचे मोठे चित्र काढण्यास सांगितले. टॅव्हर्निअरला हे काम सांगून तो व्यापारी युरोपमध्ये काही कामासाठी निघून गेला.

टॅव्हर्निअर त्याच दिवसापासून ते चित्र तयार करून लागला. रोज त्या बागेत जाऊन जसे दिसेल त्याप्रमाणे चित्र तयार होऊ लागले. एक वर्ष ते चित्र तयार करण्यास लागले. पुढे वर्षभराने तो व्यापारी परत आला, तो ते चित्र तयार झाले होते. व्यापा-याने ते चित्र पाहून चित्राची तारीफ केली. परतु एक चूक त्याला दाखवावीशी वाटली. व्यापारी म्हणतो, ''ही झाडे वगैरे सर्व हुबेहुब आहेत; परंतु There ought to have been a few dashes of sublight. या सूर्यप्रकाशाचा रंग जरा जास्त उठावदार पाहिजे होता.'' चिता-याची चूक तर दाखविली पाहिजे म्हणून त्या व्यापा-याने दाखविली. परंतु टॅव्हर्निअर निःस्पृह होता. तो त्या धनिकास म्हणाला, ''या बाबतीत तुम्हास ईश्वराकडे तक्रार केली पाहिजे. सूर्याचा प्रकाश चित्र काढावयाचे वेळेस जसा होता, तसा मी दाखविला आहे. I have not the way to change the way the sun shines. I cannot paint what I don't see. सूर्याच्या प्रकाशाला मला बदलता येणार नाही. जे मला दिसत नाही ते मी चितारू शकत नाही.''

टॅव्हर्निअरचे उत्तर ऐकून तो व्यापारी लाजला. त्याने योग्य ती किंमत दिली. हे चित्र अत्यंत उत्कृष्ट म्हणून कॅलिफोर्नियामध्ये प्रसिध्द आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel