*Rx*

*फार्मासिस्ट तुमच्या आरोग्यासाठी...* *भाग ११*


अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य (Food and Drug Administration, Maharashtra State)


अन्न आणि औषध प्रशासन ही महाराष्ट्र शासनातील एक विभाग आहे. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी १९७० रोजी याची स्थापना झाली. सुरवातीला अन्न आणि औषध भेसळ प्रतिबंध कायदा १९५४ याचे १९७० साली अन्न व औषध प्रशासन हा स्वतंत्र विभाग अस्तित्वात आले. या विभागाचे कामकाज आणि नियंत्रण तीन विभागात चालते.

१)औषध विभाग

२)अन्न विभाग

३)अन्न आणि औषध नियंत्रण प्रयोगशाळा


१)औषध विभाग

औषधे ही रुगणांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात त्यामुळे त्यासंदर्भात योग्य नियंत्रण करणे गरजेचे असते.

अन्न आणि औषध प्रशासन हे राज्यातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने औषधांच्या नियंत्रणासाठी कार्यरत असते. औषधांची भेसळ रोखणे, शुद्ध आणि परिणामकारक औषधांचा पुरवठा व्हावा,रुग्णांची फसवणूक टाळणे  याबात खलील कायद्यांतर्गत काम करते.

१)औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ (Drugs & Cosmetics act 1940 and Rule 1945)

२)औषधाबाबत आक्षेपार्ह जाहिरात विषयक कायदा (Drugs and Magic Remedies (Objectionable Advertisements) Act, 1954)

३)गरजेच्या वास्तुबाबत कायदा आणि औषध मूल्य नियोजन आदेश २०१३ (Essential Commodities Act’ 1955 there under Drugs Price Control Order’ 2013)

४) अंमली पदार्थ (नाश निर्माण करणारी औषधे) आणि मानसोपचार विषयक पदार्थ कायदा १९८५.  Narcotics Drugs and Psychotropic Substance Act’ 1985

५)विषारी पदार्थ विषयक कायदा १९१९ आणि महाराष्ट्र राज्य विषारी पदार्थ नियम १९७६. (Poison Act 1919 and Rules thereunder and Maharashtra Poison Rule 1976)


राज्यज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न आणि औषध प्रशासनात खलील यंत्रणेप्रमाणे कामकाज चालते

राज्य पातळी- अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त >>> अन्न आणि औषध प्रशासन संयुक्त आयुक्त >>> अन्न आणि औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त>>> औषध निरीक्षक


विभागीय पातळी

अन्न आणि औषध प्रशासन संयुक्त आयुक्त>>>अन्न आणि औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त>>> औषध निरीक्षक


जिल्हा पातळी

अन्न आणि औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त>>> औषध निरीक्षक


२)अन्न विभाग

हा विभाग अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत काम करतो हा कायदा ५ ऑगस्ट २०११ रोजी अस्तित्वात आला. अन्न भेसळ थांबवणे, नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित अन्न पुरवठा करणे ही या विभागाची उद्दिष्ट आहेत. या विभागाचे कामकाज हे औषध विभागप्रमाणेच असते. औषध विभागात ज्याप्रमाणे औषध निरीक्षण असतो त्याचप्रमाणे या विभागात अन्न निरीक्षक असतो.


३)अन्न आणि औषध नियंत्रण प्रयोगशाळा

महाराष्ट्र राज्यातील अन्न आणि औषध तपासणीची आणि विश्लेषण क्षमता वाढवणे, त्यासाठी लागणारा वेळ कमी करणे, नागरिकांना योग्य आणि दर्जेदार अन्न व औषध पुरवठा व्हावा यासाठी प्रयोगशाळांची निर्मिती करणे यासाठी हा विभाग कार्यरत असतो.

मुंबई आणि नागपूर येथील विद्यमान प्रयोगशाळांच्या विस्तारासाठी प्रक्रिया सुरू करणे आणि नवीन प्रयोगशाळा स्थापन ही या विभागाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, अमरावती येथे प्रयोगशाळांची निर्मिती झाली आहे.*We are Pharmacist Always Ready for Your Health Better Drugs for Better World.*


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैरणे (नवी मुंबई)

९७६५२६२९२६

ashishkarle101@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel