यापूर्वी आपण फार्मसी करिअर साठी एक उत्तम पर्याय या लेखामध्ये फार्मसी बद्दल तपशीलवार माहिती  तसेच या क्षेत्रात आपण कसे येऊ शकता, यातील करिअरच्या विविध संधी याची माहिती घेतली  होती


जे विद्यार्थी फार्मसी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना माहिती मिळावी म्हणून या लेखामध्ये आपण फार्मसी या अभ्यासक्रमात  कोणकोणत्या विविध विषयांचा अभ्यास केला जातो व त्या विषयाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ...


१)औषधनिर्मिती शास्त्र (Pharmaceutics): या विषयात मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती शिवाय प्रयोगशाळा स्तरावर औषध निर्मिती व त्याचा अभ्यास, त्यामधील विविध टप्पे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. या मध्ये औषध बनवण्यासाठी लागणारे घटक, औषधांचे तसेच ते बनवण्यासाठी लागणारे घटक यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म आशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो.

दुसऱ्या शब्दात औषधनिर्मिती शास्त्र हा विषय खऱ्या अर्थाने फार्मसी प्रोफेशनचा एक मूलभूत भाग आहे.


२)औषधीशास्त्र (Pharmacology) : फार्मसी मधील हा एक अत्यंत महत्वपूर्ण विषय असून यामध्ये शरीराचा औषधांवर होणार परिणाम व औषधाचा शरीरावर होणार परिणाम, औषध कशा प्रकारे काम करते , औषधांच्या वापरामुळे होणारे अनिष्ट परिणाम या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो.


३)औषधीवनस्पती शास्त्र (Pharmacognosy): या विषयामध्ये वनस्पती तसेच नैसर्गिक स्त्रोत यापासून  मिळवलेली औषधे, त्यातील मुख्य घटक, या घटकांची कृत्रिम रासायनिक पध्दतीचा वापर करून नवनवीन औषधांची निर्मिती करणे, आशा नैसर्गिक औषधांच्या रासायनिक व भौतिक गुणधर्माचा अभ्यास या विषयात केला जातो.


 ४)जैवरसायन शास्त्र (Biochemistry): यामध्ये मानवी शरीरातील विविध रासायनिक पदार्थ जसे प्रोटीन, व्हिटॅमिन, डी एन ए, आपल्या आहारातील घटकांचा रासायनिक    दृष्टीने अभ्यास या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो.


५) सेंद्रिय रसायनशास्त्र (Organic Chemistry): यामध्ये विविध रासायनिक घटक व त्यांचा रासायनिक व भौतिक गुणधर्माचा अभ्यास केला जातो.


६) सूक्ष्मजीव शास्त्र (Microbiology) :

या विषयात विविध सुक्ष्म जिवांचा लाभदायक तसेच हानिकारक सुक्ष्म जीव (रोगजंतू), यामुळे होणारे विविध आजार व त्यावरील उपचा या गोष्टींचा अभ्यास केला जातो.


७)मनवी शरीरशास्त्र : यामध्ये मनवी शरीरातील विविध संस्था तसेच या संस्थांची कार्यपद्धती, यामध्ये येणारे विविध अडथळे, विविध आजार आशा गोष्टींचा अभ्यास केला जातो.


८)हॉस्पिटल फार्मसी: यामध्ये हॉस्पिटल मधील फार्मसिस्ट ची कामे त्याची कर्तव्य आणि हॉस्पिटलमधील Pharmacy and Therapeutic Committee PTC मधील फार्मसिस्ट ची भूमिका या सर्वांचा अभ्यास केला जातो.



९)डिस्पेनसिंग फार्मसी आणि कम्युनिटी फार्मसी: यामध्ये औषध निमिर्ती व वितरण तसेच नव्याने आलेली संकल्पना कम्युनिटी फार्मसी ज्यामध्ये संपूर्ण सामाजिक दृष्टीकोणातून लोकांच्या फार्मसिस्टची भूमिका या सर्वांचा अभ्यास केला जातो.


१०)भौतिकशास्त्रविषयक फार्मसी (Physical Pharmacy): 

या विषयामध्ये औषधनिर्माणशास्त्राच्या दृष्टीने महत्वपूर्ण भौतिक संकल्पनाचा अभ्यास केला जातो.


११)औषधनिर्मितीविषयक अभियांत्रिकी (Pharmaceutical Engineering): याविषयामध्ये औषधनिर्मिती संदर्भात वापरली जाणारी उपकरणे, यंत्रे याबद्दल अभ्यास केला जातो.



१२)औषधनिर्मितीविषयक व्यवस्थापन (Pharmaceutical Management):

या विषयामध्ये औषधनिर्माणशास्त्र विषयक व्यवस्थापन यासंदर्भात विविध संकल्पना यांचा तपशीलवार अभ्यास केला जातो.


१३)औषधनिर्मितीविषयक जैवतंत्रज्ञान (Pharmaceutical Biotechnology): या विषयामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर करून औषध निर्मिती व जैवतंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्र व फार्मसीसंदर्भातील जैवतंत्रज्ञानाचा वापर या सर्व गोष्टींचा तपशीलवार अभ्यास केला जातो.


१४)औषधविषयक रसायनशास्त्र (Medicinal Chemistry):या विषयामध्ये औषधा संदर्भातील रसायनशास्त्र, विविध रासायनिक गुणधर्म आशा गोष्टींचा तपशीलवार अभ्यास केला जातो.



१५)न्यायवैद्यकशास्त्रविषयक फार्मसी (फॉरेन्सिक फार्मसी)


१६)औषधनिर्माणशास्त्रविषयक कायदे.


WE ARE PHARMACIST ALWAYS READY FOR YIUR HEALTH BETTER DRUGS FOR BETTER WORLD!


आशिष अरुण कर्ले.

गेहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोपरखैराने (नवी मुंबई)

ashishkarle101@gmail.com

९७६५२६२९२६

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel