फ्रँकलिन घराण्याचा इंग्लंडमध्यें छळ होऊं लागला म्हणून सतराव्या शतकाच्या शेवटच्या भागांत ही मंडळी अमेरिकन प्रदेशांत येऊन बोस्टन या बंदरीं दाखल झाली. बेंजामिन फ्रँकलिन यांच्या वडिलांचे नांव जोशिया फ्रँकलिन असें होतें. जोशिया यांस १७ मुलें झालीं. पहिल्या पत्नीपासून ४ व दुस-या पत्नीपासून १३. बेंजामिन याचा नंबर पंधरावा होता. जोशिया हा मेणबत्ती करण्याचा धंदा करीत होता. तो चांगलें गात असे व वाजविणारा पण चांगला होता. बेंजामिनचा जन्म १७०६ मध्यें झाला.

वाढतां वाढतां बेंजाकिन सात वर्षाचा झाला. एक दिवस त्याच्या आईनें त्याला कांहीं पैसे दिले, वडिलांनी पण आणखी दिले. आई मुलास म्हणाली ''बेन या पैशांचा नीट उपयोग कर हां !'' आज प्रथम बेंजाकिनच्या हातांत पैसे आले होते. तो आनंदानें उडया मारीत घरांतून बाहेर पडला व बाजारांत चालला. इतक्यांत समोरून एक मुलगा जोरानें शिटी फुंकीत येत होता. त्या शिटीचा कर्कश आवाज बेंजामिनच्या कर्णरंध्रात घुमूं जागला. आपल्यास जर अशी शिटी मिळेल तर काय बहार होईल असें त्यास वाटलें. बेननें त्या मुलास विचारिलें ''ही शिटटी कोठें मिळते ? त्या दुकानांत आणखी अशा आहेत का ?'' तो मुलगा म्हणाला ''हो, पुष्कळ तेथें आहेत, त्या समोरच्याच दुकानांत जा.''

बेंजामिन तीरासारखा तडक गेला आणि धापा टाकीतच त्या दुकानांत शिरला. 'एकादी शिटी आहे का ? असल्यास माझ्या जवळचे सर्व पैसे मी देतों व एक शिटी मला द्याच-असें एखाद्या हुशार माणसाप्रमाणें बेन त्या दुकानदारास म्हणाला. दुकानदार म्हणाला'' तुझ्याजवळ थोडेच पैसे असतील; ते शिटीस पुरणार पण नाहींत. ''बेंनामिननें आपले सर्व पैसे पुढें केले. ती रक्कम पाहून त्यापा-यानें बेनला सुखानें एक शिटी दिली बेंजामिनला पहिल्यापासून वाटत होतें कीं आपल्या जवळील पैसे असा मोठा आवाज काढणा-या शिळीस पुरणार नाहींत, परंतु दुकानदारानें आनंदाने शिटी दिली हें पाहून तो कृतज्ञपणें त्याचे आभार मानून उडया मारीत रस्त्यानें शिटी फुंकीत चालला.

आनंदानें हरिणासारखा टिपणें घेत बेंजामिन घरीं आला. त्यानें सर्वाच्या कानठळया आपल्या शिटीच्या गोड आवाजानें बसवून टाकिल्या, आईनें विचारिलें'' बेन, काय आणलेंस? ही कर्कश आवाजाची शिटी का? काय किंमत पडली हिला?''  ''माझ्या जवळचे सर्व पैसे मीं दिले. आणि त्या दुकानदारानें जास्त न मागतां मला आनंदानें ही शिटी दिली, आई, चांगला आहे नाहीं काम तो दुकानदार ? ''बेंजामिनचें उत्तर ऐकून आई म्हणाली 'हा वेडया, सर्व का पैसे द्यावयाचे ? तूं तर चौपट पाचपट किंमत दिलीस !

इतक्यांत बेंजामिनचे इतर भाऊ तेथें गोंळा झाले ते सर्व जण त्यास खिजविण्यासाठीं म्हणाले ''एकंदरींत बेन तूं फारच शहाणा आहेस बुवा १ आम्ही तर बिस्किटें, वडया काय काय आणलें असतें. ''बेंजामिन रडूं लागला. त्याची आई त्यास म्हणाली'' उगी बेन, रडूं नको आजच्या अनुभवानें शहाणा हो म्हणजे झालें. ''इतक्यांत बेंजामिनचाबापही तेथें आला व म्हणाला'' मी माझ्या लहानपणीं तुझ्यापेक्षां जास्त पैसे देऊन असाच फसलों होतों; उगी; रडणें चांगलें नाहीं; पूस डोळे आणि हांस बरें एकदां! अत:पर शहाणा हो म्हणजे झालें.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel