बेंजामिनचा प्रयोग यशस्वी झाला. विजयशील बेंजामिननें लंडन येथील रॉयल सोसायटीस एक पत्र लिहिलें. प्रयोग कोणी केला हें न कळवितां प्रयोगाची हकीगत मात्र या १६ ऑक्टोंबर १७५२ च्या पत्रांत त्यानें कळविली बेंजामिन यास रॉयल सोसायटीचा सभासद एकमतानें निवडण्यांत आले. पुढील वर्षी त्या बहुमानदर्शक असें कॉप्लें पदक देण्यांत आलें. येल येथील विश्वविद्यालयानें त्याला सन्मानदर्शक पदवी दिली, हॉर्बर्ड विद्यापीठानें तेंच केलें. एका क्षणांत फिलॅडेल्फिया येथील हा पुरूष जगविख्यात झाला. विश्वविद्यालयीन मान-सन्मानांनीं तो सजविला गेला. पॅरिस येथील शास्त्रज्ञांच्या संस्थेनें न्यूटनप्रमाणें बेंजामिनला सभासद नेमून घेतलें. बेंजामिनचा हा शोध ऐकून प्रख्यात जर्मन तत्त्ववेता कान्ट म्हणाला, ''स्वर्गीय अग्नि भूतलावर आणणारा हा देवदूतच आहे. ''सेंट अण्ड्रयज, ऑक्सफड्र, एडिंबरो येथील विश्वविद्यालयांनी त्यास ''डॉक्टर ऑफ लॉल ''ही पदवी अर्पण केली. बेंजामिनचा सन्मान करण्यासाठी युरोप व अमेरिका यांची जणूं स्पर्धाच लागून राहिली होतीं. बेंजामिननें ' विद्युदंड ' तयार केला. सर्व मोठमोठया इमारतींवर हल्ली जो त्रिशूळांच्या आकारासारखा लोखंडी दांडा असतो तो बेंजामिनेच प्रथम तयार केला, अशा रीतीनें इमारतीचें विजेपासून संरक्षण करण्याची त्याची युक्ति पाहून सर्व जगानें त्याचे आभार मानिले जगावर त्याचें हे फार उपकार आहेत.

बेंजामिन यानें दुस-या कांहीं गोष्टींत शोध करण्याचा विचार केला होता. ' हिप्रॉटिझम ' सारख्या शास्त्राची त्याच्या मनांत कल्पना होती. परंतु या शास्त्रीय शोधांत त्याचें आयुष्य जाणें अशक्य झालें. दुस-या महत्वाच्या गोष्टी उपस्थित झाल्या व बेंजामिनला त्यांत लक्ष घालण्याशिवय गत्यंतर नव्हतें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel