बेंजामिन याचीं सर्वत्र स्तुतिस्तोत्रें गाण्यांत आलीं. त्याचा निरनिराळया त-हांनीं गौरव करण्यात आला. एका नवीन शहरास ' फ्रॅकलिन ' हें नांव देण्यांत आलें. त्या शहरांत एक प्रार्थनामंदीर उभारण्यांत आलें. या प्रार्थनामंदिरांतील घंटा बेंजामिननें द्यावी असें त्यास फ्रान्समध्यें कळविण्यात आलें. परंतु बेंजामिननें घंटा देण्याऐवजीं या प्रार्थनामंदिरास पुस्तकांचीं देणगी दिली. कारणे आवाजापेक्षां अर्थ मोलवान आहे. ''Sense being preferable to Slund ''असें त्यानें लिहिलें होतें. हीं पुस्तकें धार्मिक, राजकीय व शास्त्रीय अशीं होती. हीं पुस्तकें त्या प्रार्थनामंदिरांत ठेवण्याचा मोठा समारंभ झाला. रेव्हरंड नॅथेनल ईमन्स यानीं ''मनुष्याची थोरवी ''या विषयावर सुंदर व्याख्यान दिलें. हें व्याख्यान इ.स. १७८७ मध्यें छापून काढण्यांत आलें, व नॅथेनल यानें हें फ्रँकलिन यास अर्पण केलें. या अर्पण पत्रिकेंत पुढीज मजकूर होता.

''To his excellency Benjamin Franklin, President of the state of Pennsylvania, the ornament of genius, the patreon of science, and the boast of man, this discourse is subscribed with the greatest deference, humility and gratitude, by his obliged and most humble servant.
the author. ''

या वरील वाक्यांचा सारांश ''अलौकिक बुध्दिमान्, शास्त्रांचा आधार, मानव्यांस भूषण असे पेन्सिल्वॅनिया या वसाहतींचे अध्यक्ष जे फ्रँकलिन साहेब, त्यांस हा ग्रंथ भक्तीने प्रेमानें व कृतज्ञतेनें ग्रंथकरानें अर्पण केला आहे. ''एका विद्वान माणसाकडून बेंजामिनचा हा केला गेलेला गौरव आपणांस बेंजामिनची योग्यता पटवून देतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel