दू कुश - काराकोरम - हिमालय (HKKH) हा मध्य आशियाई उंच डोंगराळ प्रदेश पृथ्वीचा तिसरा ध्रुव म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश दहा देशांमधील 4.2 दशलक्ष चौरस किलोमीटर (1.7 दशलक्ष चौरस मैल) क्षेत्रावर पसरलेला आहे, यांमध्ये भारत, पाकिस्तान, चीन, नेपाळ, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, आणि ताजिकिस्तान या देशांचा समावेश आहे.उत्तर आणि दक्षिण ध्रुवा वगळता हे एकमेव असे ठिकाण आहे, जिथे जगभरातील जास्त हिम आणि बर्फ जमा होते, आणि म्हणूनच या भागाला पृथ्वीचे तिसरे ध्रुव म्हणून ओळखले जाते.


 
चित्र स्त्रोत The Third Pole | Understanding water, climate and nature in Asia

पृथ्वीच्या तिसऱ्या ध्रुवाची वैशिष्ट्ये:
•    जगातील सर्वात उंच पर्वतांसह, 8,000 मीटर (5 मैलां) वरील सर्व 14 शिखरांचा समावेश पृथ्वीच्या तिसऱ्या ध्रुवामध्ये होतो.
•    हे क्षेत्र पृथ्वीवरील 10 मुख्य नद्यांचा स्रोत आहे, ज्यामध्ये ब्रह्मपुत्र, गंगा, इंडस, इरावाडी, मेकोंग, साल्विन, तारिम, यांग्त्जे, पिवळा आणि अमु दर्या या नद्यांचा समावेश होतो.
•    या बर्फाच्या क्षेत्रात ध्रुवीय प्रदेशांच्या बाहेर गोड्या पाण्याचे सर्वात मोठे साठे आहेत. यातील पाणी आशियातील 1.9 अब्जपेक्षा जास्त लोकांना, (जागतिक लोकसंख्येचा एक चतुर्थांश भाग) वीज आणि पिण्याचे पाणी देते.
•    हे ठिकाण नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे आणि त्यात चार जागतिक जैवविविधता हॉट-स्पॉट्स आहेत.
•    तिसरा ध्रुव क्षेत्रामध्ये प्रचंड सामाजिक आणि सांस्कृतिक भिन्नता आहे; 600 पेक्षा जास्त भाषांमध्ये आणि बर्‍याच पोटभाषांमध्ये संभाषण करणार्‍या अनेक जातीय समुदायांचे येथे मूळ आहे.
•    पर्वतांमध्ये मुळे असलेल्या या नदी पात्रांमध्ये तयार झालेल्या अन्न व उर्जामुळे तीन अब्जाहून अधिक लोकांना फायदा होतो.

असे असले तरी, तिसर्‍या ध्रुवामधील हवामान बदल ही आता एक चिंतेची बाब आहे. पर्वतीय रचना मुख्यतः हवामान बदलांसाठी कारणीभूत असते आणि मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असलेला तिसरा ध्रुवीय प्रदेश जागतिक हवामान बदलला कारणीभूत ठरत आहे.

नदीच्या यंत्रणेतील बदलांचा परिणाम थेट लोकजीवनावर झाला आहे. तिसर्‍या ध्रुवामध्ये तापमानवाढीचे प्रमाण ऐहिक सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात असले तरी हे भार उंचावरून वाढविण्यात आले आहे, जे हवामान बदलांच्या क्रिओस्फेयर वातावरणाची अधिक संवेदनशीलता दर्शवते. हा ट्रेंड कायम राहील अशी अपेक्षा आहे. हवामान बदलांच्या अंदाजानुसार शतकाच्या अखेरीस दक्षिण आशियातील सर्व भागात कमीतकमी 1 डिग्री सेल्सियस तापमान वाढण्याची शक्यता आहे, तर काही भागात तापमान तापमान 3.5 ते 4 डिग्री सेल्सियस पर्यंत राहील. हवामान बदलांमुळे तिसर्‍या ध्रुव प्रदेशातील लोकसंख्येचे जीवन व जीवनमान संकटात पडले आहे आणि तिसर्‍या ध्रुवमुळे प्रभावित प्रदेशाची सुरक्षा आणि विकास धोक्यात आला आहे, ज्यामुळे संपूर्ण खंड आणि जागतिक पातळीवरही त्याचे परिणाम उद्भवू शकतील. असे असले तरी परिसरातील लोकांमध्ये या धोक्याबद्दल जबाबदारीची जाणीव आणि जागरूकता कमी आहे. केदारनाथ प्रलय देखील या हवामान बदलाचा परिणाम आहे. म्हणून पर्वतीय रचना, सामाजिक जीवनव्यवस्था यांवर अभ्यास करून उपाययोजना राबवण्यासाठी अनेक संस्थांनी मोहिमा हाती घेतल्या आहेत.

जागतिक हवामान संस्था (डब्ल्यूएमओ) ने या प्रदेशात प्रादेशिक हवामान केंद्रांचे जाळे उभारण्याची योजना आखली असून त्याचे नाव टीपी-आरसीसी नेटवर्क असे ठेवले. स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा येथील डब्ल्यूएमओ मुख्यालय कार्यालयात 27 मार्च ते 28 मार्च 2018 दरम्यान इम्पलेमेंटेशन प्लँनिंग मीटिंग ऑफ द थर्ड पोल रिजनल क्लायमेट सेंटर नेटवर्कच्या अंमलबजावणीबद्दल एक व्यासपीठ बैठक घेण्यात आली. या नेटवर्कमध्ये चीन, भारत आणि पाकिस्तान या नेटवर्कसाठी अग्रगण्य नोड असण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel