विज्ञानामागील सायन्स

'मोनो ट्रेन' आणि 'मेट्रो ट्रेन' यात काय फरक आहे?

Author:अभिषेक ठमके

आपल्या मुंबईमध्ये मेट्रो आणि मोनो रेलचे आगमन सलग झाल्याने मुंबई आणखी दागिन्यांनी सजल्यासारखी वाटू लागली. बर्‍याच लोकांनी मोनोरेलबद्दल केवळ ऐकले आहे, परंतु प्रत्यक्षात ते कधीही पाहिले नाही. आणि मेट्रो आपण आधीपासून सिनेमांमध्ये पाहत आलो आहोत. ही सेवा भारतासह बर्‍याच देशांमध्ये उपलब्ध आहे (पूर्वी फक्त काही देशांना उपलब्ध होती).

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-b40ba2996f595131f3e850826f4c49f6

विस्तृत माहिती देण्याआधी दोघांच्या हेतूंमधील एक फरक सांगू इच्छितो, मेट्रो ही रहदारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आहेच, पण ती रेल्वेला पर्याय म्हणून वापरली जाते. आणि मोनोरेल ही रहदारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरली जाते. म्हणूनच जगातील 178 मेट्रो शहरांमध्ये मेट्रो रेल सेवा आहे. आणि मोनोरेल केवळ आशियातील 20 शहरांमध्ये कार्यरत आहे. मोनोरेल आणि मेट्रो रेल या दोहोंचा उद्देश मास ट्रान्झिट सिस्टम अधिक सोयीस्कर आणि वेगवान बनविणे आहे. यांचा वेग, डिझाइन आणि किंमतीत फरक आहे (असणारच). पहायला गेलं तर, दोन्ही पर्यायांची रचना एकाच संकल्पनेपासून तयार झालेली आहे, ती म्हणजे गर्दीवर नियंत्रण मिळवून रहदारी कमी करणे आणि प्रवाशांचा वेळ वाचवणे. जास्त प्रवासी वाहून नेण्यासाठी आणि अंतर वेगाने पार करण्यासाठी मेट्रो आणि मोनो रेल कमी वजन असलेल्या साहित्यापासून बनवल्या आहेत.

हे दोघेही खास एलिव्हेटेड ट्रॅकवर चालतात. दोन्ही पर्याय वाहतुकीची व्यवस्था अधिक सोयीस्कर आणि वेगवान करतात. दोन्ही गाड्या इंधन म्हणून विजेचा वापर करून धावतात आणि म्हणून कोणतेही पेट्रोलियम पदार्थ वाया जात नाहीत. तरी देखील दोघांमध्ये पुढील फरक आहेत.

  • मेट्रो रेल आणि मोनोरेल स्वतंत्र ट्रॅकवर धावतात आणि पारंपारिक गाड्यांच्या तुलनेत त्यांची गती खूप जास्त आहे. परंतु दरम्यान तुलना करताना, मेट्रो रेल मोनोरेलपेक्षा अधिक वेगवान आहे.
  • मेट्रो रेल्वे इतर सामान्य गाड्यांप्रमाणेच दुहेरी मार्गावर चालते. (2 ट्रॅक्स) आणि मोनोरेल एकाच ट्रॅकवर चालते.
  • मेट्रो ट्रेनमध्ये 9 पर्यंत कोच असू शकतात. मोनोरेलमध्ये 4 कोच असतात.
  • मेट्रो रेल उभारणीसाठी बर्‍याच मोठ्या मोकळ्या जागेची आवश्यकता असते, त्यामानाने मोनोरेलला कमी जागेची आवश्यकता असते आणि ते अरुंद विभागांमध्ये (ओव्हरब्रिज खांब उभे करून) देखील कार्य करू शकतात.
  • मेट्रो रेल्वे इतर गाड्यांप्रमाणे वेगवान धावू शकते आणि मोनोरेलची गती प्रचलित वाऱ्याच्या अंदाजावर अवलंबून असते. सुरक्षिततेच्या कारणामुळे ती केवळ मध्यम वेगाने धावते.
  • मेट्रो रेल एका तासामध्ये 40000 प्रवाशांना हाताळू शकते. मोनोरेल एका तासात केवळ 10000 प्रवाशांना हाताळू शकते.
  • ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित असल्याने मेट्रो रेल्वेचे भाडे जास्त आहे. मोनोरेल प्रवासाचे भाडे कमी आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to विज्ञानामागील सायन्स


नाईट वॉक : लघुकथा संग्रह
टेरर ऍटॅक ऍट डोंबिवली स्टेशन
मैत्र जीवांचे