बूध हा सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह आहे आणि नेपच्यून हा सूर्यापासून दूर असलेला ग्रह आहे. नेपच्यूनच्या पलीकडील सर्व ग्रहांना बटुग्रह म्हणतात.
आता तुम्हाला वाटत असेल, शाळेत शिकवल्याप्रमाणे प्लूटो हा देखील ग्रह आहे. आणि तो नेपच्यूनपेक्षा देखील दूर आहे. मग नेपच्यून हा सूर्यापासून दूर असलेला ग्रह का आहे?
तर 20 ऑगस्ट 2006 रोजी झेक प्रजासत्ताकमधील झाक येथे भरलेल्या 57 व्या खगोल परिषदेत प्लुटोचे ग्रहपद काढून घेण्यात आले. त्याला आता 134340 हा क्रमांक देण्यात आला आहे. प्लूटो आता बटुग्रह या प्रकारात मोडतो. सूर्यमालेमध्ये आतापर्यंत शोध लागलेले पाच बटुग्रह आहेत. प्लूटो, लघुग्रहांच्या पट्ट्यातील सेरेस, कायपरचा पट्ट्यातील एरिस, हौमिआ व माकीमाकी. या पाच पैकी तीन बटुग्रहांभोवती चंद्र आहेत.
बूध:
- बूधचे सूर्यापासुन चे अंतर – 5,79,09,100 कि.मी.
- परिवलन काळ – 59
- परिभ्रमन काळ – 88 दिवस
- इतर वैशिष्टे – सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.
नेपच्यून:
- नेपच्यूनचे सूर्यापासुन चे अंतर – 4.50 अब्ज कि.मी.
- परिवलन काळ – 16 तास
- परिभ्रमन काळ – 164 1/2 वर्षे
- इतर वैशिष्टे – या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
पृथ्वी (Bonus)
- सूर्यापासुन चे अंतर – 14.96
- परिवलन काळ – 23.56 तास
- परिभ्रमन काळ – 365 1/4 दिवस
- इतर वैशिष्टे – सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.